You are currently viewing नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

नारी शक्ती पुरस्कारासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

केंद्र शासनाकडून पीडित व संकटात सापडलेच्या महिलांचे, आर्थिक व सामाजिक सबलीकरणाचे काम करणाऱ्या व्यक्तींसाठी सन 2022 या वर्षासाठी नारी शक्ती पुरस्कारासाठी www.awards.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दीतीने दि. 31 ऑक्टोंबर 2022 पर्यत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  सोमनाथ रसाळ यांनी केले आहे.

            महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण, पारंपारिक व अपारंपारिक क्षेत्रात महिलांचे कौशल्य वाढविणे, ग्रामिण महिलांना सोयी – सुविधा पुरविणे, विज्ञान व तंत्रज्ञान, खेळ, कला, संस्कृती, महिलांची सुरक्षा, महिलांचे आरोग्य व निरोगीपणा, महिलांचे शिक्षण, कौशल्य विकास या सारख्या अपारंपारिक क्षेत्रात महिलांना प्रात्साहन देणे, महिलांचा आदर व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी केलेले कार्य याकरिता, केंद्र शासनाकडून नारी शक्ती पुरस्कार  दिला जातो. प्रत्येक पुरस्कारासाठी भारत सरकारतर्फे रोख 2 लाख रुपये, पुरस्कार व प्रशस्तीपत्र दिले जाते.

            पुरस्कारासाठी पात्रता पुढीलप्रमाणे,फक्त वैयक्तिक कार्याकरिता, नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येते. वैयक्तिक पुरस्कारासाठी नामांकन दाखल करणाऱ्या व्यक्तिचे वय दि. 1 जुलै 2022 रोजी 25 वर्षापेक्षा कमी नसावे. अर्जदाराला यापूर्वी लगतच्या वर्षासाठी नारी शक्ती तसेच स्त्री-शक्ती पुरस्कार मिळालेला नसावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा