*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी विनायक जोशी लिखीत अप्रतिम काव्यरचना*
@# *नाक घासती* #@
बदनाम केले गलिच्छ समजून
तरी नेमता मध्यस्थ *कावळा*
आठवण येते नेहमी आम्हाला
नाही मानला कधी *सोवळा*
//१//
सकाळ होता *बाळ* खेळते
नाम कावळ्याचे सर्वा स्मरते
घास जरी म्हणता *चिऊचा*
उपस्थिती मात्र आमची असते
//२//
जन्मापासून काळया कोटात
वकील फिरती माझ्या वेशात
पालथी घालतात “सर्व” कोर्ट
मान्यता पावला सर्व दुनियेत
//३//
असे जरी तो *गोरा* बगळा
ढोंगी तपस्वी मनातून काळा
हक्कात नाही कुठे तडजोड
पिंडास शिवतो फक्त कावळा
//४//
इस्टेटीसाठी हक्कदार वारस
पिंडांना नाही शिवत *कुणी*
मुठीत धरून *नाक घासती*
नाईलाजाने लावती *लोणी*
//५//
करा प्रार्थना पंधरा दिवसांनी
हजर राहू बनून तुमचे *बाप*
जर कां हेवा कराल आमचा
कावळे असुनही देऊ *शाप*
//६//
विनायक जोशी 🥳ठाणे
मीलनध्वनी:९३२४३२४१५७
३४१/बुधवार/७ सप्टेंबर २२