*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*
**गुरू गुरू** भाग 2
चाणक्याच्या लहान पणाचा इतिहास फारसा उपलब्ध नाही. पण एका शेळ्या मेंढ्या राखणारया मुलाला आपल्या शिक्षण आणि गुरू सामर्थ्याने राजा करणारे गुरू आहेत. आपल्या कुशाग्र बुध्दी मततेने त्याची ख्याती होती.हे ऐकून मगध राजा नंदाने चाणक्य यांना निमंत्रण दिले. चाणक्य मगध सत्तेचा दोनधयक्ष झाला. परंतु जनता राज्याच्या मनमानी कारभारामुळे लोक त्रस्त झाली होती. चाणक्य यांनी जनतेची गोरगरीब लोकांची बाजू घेतली याचा राजाला राग आला आणि त्या राजानें भर दरबारात चाणक्य यांचा अपमान केला.आणि चाणक्य यांना त्यांच्या आसनावरून खाली खेचले स्वाभिमानी चाणक्य यांना राजांचा विलक्षण राग आला. आणि भर दरबारात राजा धनानंदाला निक्षून सांगितले की “” हे नंदराजा नाही तुला सिंहासनावरून खाली खेचले तर नावाचा चाणक्य नाही तोवर शेंडीला गाठ बांधणार नाही “” हे उदगार एका बुध्दी जीवी ज्ञानी शिक्षकांचे होतें.
शत्रूचया हालचालींवर सावध नजर ठेवावी. तसेच तह केला म्हणून बेसावध राहू नये. शत्रूच्या प्रत्येक विरोधाला पुरुण उरणे व प्रजेचे रक्षण करणे राजांचे परम कर्तव्य आहे. धर्माचरण हे सुखी जीवनाची निर्मिती करते. धर्माचरण मूळ संस्कार मध्ये असते. इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा राजाचं सत्ता कायम ठेवतो. विनयाचे मूळ ज्ञानी महापुरुष यांच्या सेवेत आहे. ज्ञानी माणसाच्या सेवेतून जगाचे खरे ज्ञान होते. आत्मज्ञानातून विज्ञानाचा उगम झालेला असतो. आत्मा ज्ञानाचा प्राप्ती झालेला मनुष्य सदैव विजयी ठरतो. आत्मज्ञानी पुरुषाला सर्व प्रकारचें अर्थ सुक्षम ज्ञान प्राप्त होतात. योग्य अर्थशास्त्र साह्याने प्रजेची राज्याची भरभराट होतें. योग्य राजा आणि योग्य अर्थशास्त्र यामुळे निसर्गाची भरभराट होते. दुर्बल राजानें बलवान राजाशी मैत्री करुन आपल्या राज्याचे रक्षण करावे. आगीशी आपणं कस नात ठेवायचं ते राजकारणी व राजा यांचा आश्रय घेतांना त्यांच्याशी ठेवायला हवे. राज आज्ञेचया विरोधात वागू नये. दुरबलाचा आश्रय म्हणजे दुःखाचे दुसरे नाव. राजा समोर उगाच डामडौल दाखवू नये. अर्थप्राप्तीने संतुष्ट होणा-या मनुष्याचा लक्ष्मी त्याग करते. दंड नितीने शत्रूला काबूत ठेवता येते. दंडनितीने राजाला संपत्तीची प्राप्ती होते. दंड नीती नसल्यास मंत्रीही राजास जुमानेसे होतात. दंड नीतीने गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक सुतासारखे सरळ होतात. पापकर्म बिमोड झाल्याने राज्य प्रगतीपथावर जाते. सवताचे आतमरक्षण करणे ही एक प्रकारची दंड नीतीच आहे. आत्मरक्षण झाले तर इतर वस्तूंचे रक्षण होते. शुभ शकुन कार्य संपन्न होणार असल्याचे सूचित आहे.
विशेष प्रसंगी शकून नक्षत्रापेक्षा अधिक प्रभावी ठरतात. ज्या कामाची घाई आहे त्यांनी नक्षत्र योगाच्या भानगडीत पडू नये. ओळखीच्या लोकांपासून आपले अवगुण लपू शकतं नाहीत. दुर्बुद्धी व्यक्ती कायम संशयास्पद वागतो. स्वभाव बदलणे हे कठीण असतं. अपराधाचया रूपात शिक्षा असावी. परस्थिती प्रमाणे मार्गदर्शन करावे. आपली ऐपत पाहून दागिने घालावे. आपले कृत्य कुळा शोभेसे असावं. कारयानुरुप प्रयत्नात बदल करावे. दान मागणारया पात्रता पाहून त्याचप्रमाणे दान करावे. वयाला शोभेल असं वस्त्रे परिधान करावीत. नोकराने मालकांची मर्जी सांभाळून रहावे. पत्नीने नेहमी पतीच्या मर्जीत रहावे. गुरुच्या आज्ञेनुसार शिष्याने राहावे. मुलाने आई वडील यांची आज्ञा पाळावी. अति शिष्टाचार यामुळे संशय निर्माण होतो. माणूस आपल्या उन्नती अथवा विनाशास कारणीभूत ठरतो. दंड नीती ही प्रयत्नपूर्वक व सावधपणे आचरली गेली पाहिजे. राजाला दुर्बल समजून त्यांच्या आज्ञेचे उल्लंघन करू नये. अग्नी दुर्बल समजणे मूर्खा चे काम आहे. दंड नीती राज्याचे सर्व व्यवसाय कामकाज सुरळीत चालते. जशी राजाची वृत्ती असेल तशीच प्रजेची प्रवृत्ती बनत जाते चांगला राजा चांगले राज्य. धर्म व काम हे अर्थावर अवलंबून असतात. अर्थ हे सर्व कार्याचे मूळ आहे. धनवान माणसाची कार्यसिद्धी अलपश्रमाने देखील होऊ शकते. कुठल्याही कार्याचे यश त्याच्या नियोजन कौशल्यात असते.
नियोजन अभावी कार्य अयशस्वी होते. कार्य करण्याची इच्छा असणार्या त्या कार्याची फलश्रुती उपाय हीच प्रमुख सहहयक असते. सथल काल वेळ परस्थिती ओळखून कार्य आरंभ करावे. दैवतांची साथ नसेल तर सोप काम सुध्दा अवघड होतें. नीती मान व्यक्तिने देश. काळ. परस्थिती पाहूनच कार्यारंभ करावा. जो विचारपूर्वक संपत्ती. धन. धान्य. घर. हरेक प्रकारचें उपाय योजून संग्रही ठेवावी. योग्य मुहूर्त न पाहता जो कार्य सुरू करतो त्याचा लक्ष्मी त्याग करते. ज्ञान. कौशल्य. अनुभव. या जोरावर हाती घेतलेल्या कार्य परीक्षा समजून पार पाडावे. ज्याच्या कर्तव्य निपुण ते प्रमाणे कामाची विभागणी करावी. योग्य उपाय द्वारे अवघड काम देखील सोपे होऊन जाते. अज्ञानी माणसाने एखादे काम सफल करुन दाखवले तरी त्याला फारसे महत्त्व देऊ नये. किटक पक्षी लाकडाला विविध आकार देतात त्याप्रमाणे मूर्ख व्यक्तिने केलेल्या कामाला जास्त महत्त्व देऊ नका. कार्य पूर्ण झाल्यावर इतरांना त्याची वाच्यता करावी. कधी कधी ज्ञानी माणसांचे कार्य पूर्ण होऊ शकत नाही त्याचे कारणं दैवी कोप आणि मानवी चुका. संकटकाळी बुध्दी स्थिर ठेवली पाहिजे. मानवी दोषांने आलेले संकट हे कौशल्याने दूर करता येते. एखादे कार्य असफल झाले की मूर्ख लोक त्यातील चुका पोपटाप्रमाणे सांगू लागतात. कार्य पूर्ण करण्यासाठी भीडेला दूर ठेवलें पाहिजे. आपली शक्ति ओळखून कार्य प्रारंभ केले पाहिजे. स्वजन. आश्रितांना संतुष्ट करुन शेष धनावर जो निर्वाह करतो तो अमृभोगी होय .उधोगी मानसिकतेमुळे सर्वत्र भरभराट होत असते. भित्र्या मनुषयाकडून कोणतेही कार्य होणे अवघड असतें कारणं तो सदैव चिंतेत बुडालेला असतो. आश्रितांनी मालकांचा स्वभाव जाणून कार्य सिद्धी साधून घ्यावी.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859