You are currently viewing वाचनाने व लेखनाने मला काय दिले?

वाचनाने व लेखनाने मला काय दिले?

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनल गोडबोले लिखित अप्रतिम लेख*

*वाचनाने व लेखनाने मला काय दिले?*

या संदर्भात आपल्याला आलेल्या अनुभवावर आधारित एखादा लेख लिहिता येईल का पहा मॅडम. असे लेख लेखकासाठी व वाचकांसाठी प्रेरणादायी ठरतील. सहज वाटलं म्हणून.🙏🏻🙏🏻…..
हा वाचकाचा मेसेज.. उत्तम विषय सुचवल्याबद्दल आभारी आहे..
वाचनाने मला काय दिलं ?? ..
या प्रश्नाकडे वळताना मला वाटतं , वाचनाने आयुष्याकडे पहायला शिकवलं..वाचनाने शब्दसंपदा वाढली , वाचनाने माझ्यातील वक्ता जागा केला , वाचनाने माझ्यातील लेखक घडायला आणि आतमधे दडलेला लेखक बाहेर यायला सुरुवात झाली…
वाचनाने दुसऱ्याचे चांगले विचार आपल्यात उतरवण्याची कुवत वाढली .. वेगवेगळ्या साहित्यकाला वाचताना तो किती खोल जाऊन विचार करत असेल किवा लेखकाला हे सगळं कसं दिसत असेल हे पहायला वाचन शिकवतं..
जो न देखे रवी वो देखे कवी म्हणजेच काय अफाट विचार करण्याची ताकद वाचनातुन येते.. आतुन बाहेरुन शुध्द करण्याचं काम वाचन करतं..
वाचनाने जास्त ऐकायला शिकवलं , कमी बोलायला शिकवलं..
वाचनाने माझ्यातील माणुस घडवला… वेगवेगळ्या लेखकांची आत्मचरित्र वाचताना आपलं दुख काहीच नाही किवा आपण काहीच स्ट्र्गल केला नाही याची जाणीव करुन दिली.. वाचताना जाणवलं की आपण कोणीच नाही आणि आपल्यापेक्षा या जगात अनेक महान व्यक्ती आहेत त्यामुळे जमीनीवर राहायला शिकवलं.. लोकांचे अपमान पचवण्याची ताकद सुध्दा वाचनानेच दिली.

लेखनाने मला काय दिलं??
लेखनाने मला तुमच्यासारखे देव म्हणजेच वाचक दिले.. बरेच लोक जोडले गेले.. लेखन शेअर केल्यावर वाचक काय ॲंगल ने विचार करतील हे पहाण्याचा ॲंगल दिला…
लेखनाने माझ्यातील लेखिका काय पध्दतीचं लिखाण करु शकते हे बाहेर काढलं… वेगळेवेगळे विषय मांडताना वाचकांकडुन येणारा निगेटिव्ह फीडबॅक पचवण्याची ताकद दिली..
लेखनाने मेंदु सारखा काम करत राहिला त्यामुळे वाईट विचार मनात येणं बंद झालं.. सतत वाचकाना काय देता येइल या विचारात कायमच चांगले विचार मनात येत राहिले.. लेखक हा गुरु असतो त्यामुळे नकळत जबाबदारी येते तिही पेलण्याची ताकद मिळाली.. पुस्तकासोबत माणसं वाचल्याने माणसं ओळखण्याची कला अवगत झाली आणि मानवी कंगोरे सहज टिपता आले.. पुरूष हृदय लेख हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.. लेखक हा मानवी मनाचा आरसा असतो त्यासाठी आधी आपले विचार , भाषा शुध्द असणं गरजेचं असतं तरच वाचकाना तो उत्तम टॉनिक शब्दरुपात देउ शकतो… जेव्हा मी थिएटर करत होते तेव्हा सुध्दा माझ्यातील लेखक आणि कवीने खुप मोठा सपोर्ट केला..
Follow me on Insta and facebook..
My writeup link..
allsonalwrites.wordpress.com
my youtube channel..sonalcreations

सोनल गोडबोले
लेखिका,अभिनेत्री
8380087262

प्रतिक्रिया व्यक्त करा