You are currently viewing कै. अण्णा बोभाटे यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ व कुडाळ सायकल क्लब च्या वतीने स्मृतिचिन्ह व सायकल रॅलीने वाहिली विशेष श्रध्दांजली…

कै. अण्णा बोभाटे यांना रोटरी क्लब ऑफ कुडाळ व कुडाळ सायकल क्लब च्या वतीने स्मृतिचिन्ह व सायकल रॅलीने वाहिली विशेष श्रध्दांजली…

कुडाळ

स्वातंत्र्यपूर्व काळातील कुडाळ मधील ज्येष्ठ रोटेरियन, उत्कृष्ट धावपटू, खेळाडू आणि सामाजिक कामाच्या ध्येयाने प्रेरित झालेल्या एका प्रतिभावान व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ व्यापारी कै दिगंबर उर्फ अण्णा बोभाटे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व कुडाळ सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने स्मृतिचिन्ह व सायकल राईड काढून अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे अध्यक्ष सचिन मदने व कुडाळ सायकल क्लब चे अध्यक्ष रूपेश तेली यांच्याहस्ते कै अण्णा बोभाटे यांना मरणोत्तर स्मृतिचिन्ह त्यांचे ज्येष्ठ सुपूत्र देऊन राजन बोभाटे व संजय बोभाटे यांना सन्मानपूर्वक देऊन अनोखी श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ चे असिस्टंट गव्हर्नर प्रणय तेली, गजानन कांदळगावकर, सेक्रेटरी अभिषेक माने, खजिनदार अमित वळंजू, सदस्य शशिकांत चव्हाण, डी के परब, राजीव पवार, राजेंद्र केसरकर, एकनाथ पिंगुळकर, पेमेंद्र पोरे, कुडाळ सायकल क्लब चे अमोल शिंदे, अजिंक्य जामसंडेकर, शिवप्रसाद राणे, निलेश आळवे,अर्थव शिंदे, आर्चिच तायशेटये, सिध्दार्थ परब व रेन्बोरायडर्स ग्रुप सुकळवाड, निल कांदळगावकर, पार्थ बेलवलकर आदी सायकलपटू उपस्थित होते.

सन 1957 मध्ये दिल्ली येथील राष्ट्रीय धावणे स्पर्धेत कै अण्णा बोभाटे यांनी सहभाग घेत द्वितीय क्रमांक मिळवला त्यावेळी तत्कालीन भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते तसेच कोलकत्ता येथेही 1500मीटर धावणे मध्ये तृतिय क्रमांक पटकावला होता. कै अण्णा बोभाटे यांचा जन्म एका गरिब कुटुंबात झाला होता पण जिद्द, परिश्रम आणि कष्ट याच्या जोरावर शून्यातून बोभाटे कुटुंबाने गगनभरारी घेत 1985 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच तीन मजली कुडाळ स्टेटबॅकेची बोभाटे बिल्डिंग उभारली त्यावेळी लागणारे सिमेंट कोरिया वरून येथ होते बोटीने गोव्याला सिमेंट यायचे गोव्यावरून कुडाळ मध्ये आणले जायचे. सन 1987-88 च्या काळा अण्णांनी बांबू निर्यात करण्याचा धाडसी प्रयोग यशस्वी करत 8लाख बांबू सौदी अरेबिया, इराण, इराक, आदी आखाती देशांमध्ये बोटीने पाठवलेला. शालेय जीवनात चिरमूरे आणि चाॅकलेट विकून संपूर्ण शिक्षण त्यांनी स्वकष्टाने घेतले. रोटरी क्लब ऑफ कुडाळ ची स्थापना 1991 मध्ये झाली पण त्यापूर्वी अण्णा बोभाटे, डॉ ए जी सौदत्ती, डॉ पंडित, सी ए गद्रे आदींना घेऊन सावतंवाडी रोटरी क्लब च्या सहाय्याने कुडाळ मध्ये सामाजिक कार्य सुरू करून तरूणांना प्रेरित केले.
लहानपणापासूनच खेळाची व धावण्याची विशेष आवड असलेल्या अण्णांची जिद्द फार मोठी होती. त्यांचे आॅलंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न होते ते त्यांचे अपूर्ण जरी राहिले तरी अण्णांनी दरवर्षी कुडाळ व ग्रामीण भागात 26 जानेवारीला सायकल स्पर्धा आयोजित करून अनेकांना प्रोत्साहन दिले. अखंड रत्नागिरी जिल्ह्यातील त्याकाळात एकही धावण्याची स्पर्धा अण्णांनी चुकवली नाही, रत्नागिरी अखिल मुंबई स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावून अण्णांनी कुडाळ चे नाव गाजवले होते. गेल्या 20वर्षापूर्वी पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅक च्या बाजूजच्या दरीत मुंबई चे एकाच कुटुंबातील 6ते7जण पाण्यात बुडालेले असताना अण्णा बोभाटे व पुष्पसेन सावंत यांनी त्या सर्वांना बाहेर काढले होते. अलिकडच्या भंगसाळ पूल आंदोलनातही अण्णा बोभाटे यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. अशा या अखेरच्या श्वासापर्यंत कुडाळ चा विकास आणि खेळाविषयी जनजागृती, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या नवीन पिढीला प्रोत्साहन व प्रेरणा देणा-या लढवय्या ज्येष्ठ व्यापारी तसे उत्कृष्ट धावपटू खेळाडू असलेले कै अण्णा बोभाटे यांच्या अकाली निधनाने सामाजिक क्षेत्रातील पोकळी भरून न येण्यासारखी आहे पण अण्णांच्या स्मृती पुढील पिढीमध्ये जागृत ठेवण्यासाठी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व कुडाळ सायकल क्लब ने अनोखा श्रद्धांजली चा उपक्रम आयोजित करून वेगळा आदर्श निर्माण केला त्याबद्दल जनसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. यावेळी राजन बोभाटे यांनी रोटरी क्लब ऑफ कुडाळ व कुडाळ सायकल क्लब चे आभार मानले भविष्यात खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अण्णांच्या नावाने स्पर्धा आयोजित करण्याचा मानसही व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा