You are currently viewing बाल कामगार कामावर ठेवणे गुन्हा; 50 हजारांपर्यंत दंडाची तरतूद

बाल कामगार कामावर ठेवणे गुन्हा; 50 हजारांपर्यंत दंडाची तरतूद

बाल कामगार कामावर ठेवणे गुन्हा; 50 हजारांपर्यंत दंडाची तरतूद

सिंधुदुर्गनगरी

बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम 1986 नुसार 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवणे तसेच 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. मालकाने व नियोक्त्याने बालक अथवा किशोरवयीन मुलास कामावर ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड वा 6 महिने ते 2 वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो. जिल्ह्यातील सर्व अस्थापना, दुकाने, कारखाने व व्यावसायीक व नागरिकांनी बाल कामगार प्रथेविरुद्ध लढ्यात सहभागी व्हावे असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी यशवंत हुबे यांनी केले आहे.

            बाल कामगार या अनिष्ठ प्रथेचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याकरिता केंद्र शासनाने बाल कामगार अधिनियमामध्ये मोठ्या प्रमाणात बदल केले असून बाल कामगार कामावर ठेवणाऱ्यांविरोधात शिक्षेमध्ये व दंडात्मक तरतुदीमध्ये वाढ केली असल्याची माहितीही श्री. हुबे यांनी दिली आहे.

            सध्या काही ठिकाणी लहान मुलांकडून करमनुकीचे व जीवघेणे खेळ करुन घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे प्रकार निदर्शनास आल्यास तसेच जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेमध्ये बालकांना तसेच धोकादायक उद्योगांमध्ये किशोरवयीन मुलांना कामावर ठेवण्याचे निदर्शनास आल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा असे आवाहनही श्री. हुबे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा