सिंधुदुर्गातून अधिकारी घडवूया
दहावी बारावी च्या बोर्डात महाराष्ट्रात कोकण अव्वल…
पेपरची ही हेडलाईन्स स्वतंत्र *कोकण बोर्ड* झाल्यापासून दरवर्षी न चुकता आपण वाचतो. कोकणातील *गुणवंत* विद्यार्थ्यांनमुळे परीक्षेतील यशाचा टक्का सर्वोच्च राहिला आहे.
आणि याचा कोकणी माणसाला *सार्थ अभिमान* आहे……
पण…….
सरकारी नोकरीत मात्र कोकणचा टक्का अत्यल्प म्हणावा लागेल असाच आहे. शालांत परीक्षेत असलेली गुणवत्ता पुढे फारशी दिसत नाही.आणि एकच प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो….*कोकणची गुणवत्ता जाते तरी कुठे…?*
दहावीतील टक्के आणि मित्र किवा मैत्रिणीने घेतलेली साईड बघून सायन्स …कॉमर्स…आर्ट्स…घ्यायचं नक्की होत आणि खर तर इथूनच भविष्याची दिशा भरकटते . *काय केलं तर काय होईल* याच खात्रीच मार्गदर्शन कोणाकडून च मिळत नाही अन्….मग एकच पर्याय उरतो…कॉलेज पूर्ण करायचं आणि मुंबई किवा गोव्यात *मिळेल ती नोकरी* करायची.
मग हे असच चालू द्यायचं का…? अजिबात नाही.केवळ नोकरी हा शिक्षणाचा उद्देश असता नये हे नक्कीच पण सरकारी नोकरीतील कोकणचा टक्का नुसता वाढता नये तर वधारला पाहिजे…उसळला पाहिजे…
कुणीतरी म्हणेल हे दिवास्वप्न आहे…असेलही कदाचित….पण ठरवले तर *दिवास्वप्न सत्यात उतरविण्याची* धमक कोकणी माणसात आहे… फक्त त्यासाठी हवं योग्य मार्गदर्शन…..विद्याथ्र्यांसाठी आणि पालकांसाठी ही…कारण विद्यार्थी आणि पालकांच्या समन्वयातून च विद्यार्थी *उज्वल करिअरला* गवसणी घालू शकतो
आणि म्हणूनच *बुधवार दि. ७/९/२०२२* रोजी सकाळी ठीक *९:३० वाजता सिध्देश्वर मंगल कार्यालय तळवडे* येथे इयत्ता *नववी ते पदवी* पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजित केले आहे
यावेळी
*मा. श्री.सत्यवान रेडकर.*
*कनिष्ठ अनुवाद अधिकारी*
*मुंबई सीमाशुल्क*
हे निःशुल्क मार्गदर्शन करणार आहेत. *उज्वल भवितव्याच स्वप्न* पहात असाल तर (शक्यतो) पालकांसह या.तुमच्या प्रतिसादावर च *तळवडे पंचक्रोशी विचारमंच* या पुढे ही अशीच मार्गदर्शन शिबिर आयोजित करेल…
मग… येताय ना….?
चला तर….
*एक पाऊल पुढे टाकुया*
*सिंधुदुर्गातून अधिकारी घडवूया.*
(काही शंका असल्यास संपर्क नक्की करा)
श्री तेजस बांदिवडेकर.. निरवडे
7507241748
श्री नारायण परब ..तळवडे
7057133670
श्री उमेश पावणोजी .. होडावडे
9423359264
श्री राजन परब.. वजराट
9423404726
श्री दिपेश परब.. मातोंड
8329065834