*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी संगीतकार गायक अरुण गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
शिक्षक दिनानिमित्त गुरूंना करू वंदन!
*”गुरुपूजन”*
गुरु घडवती शिष्यास देऊन ज्ञान
गुरु माता गुरु पिता तिसरे गुरुजन।।ध्रु।।
गुरु दाविती प्रकाश करिती सज्ञान
शिकवती आदर्श हातचे ना राखून
संतोषती जेव्हा होई शिष्याचा सन्मान।।1।।
गुरु शिष्याचे अमोल नाते शब्दातीत
मर्मबंधाते जपूयाच सदा हृदयांत
परंपरा युग युगांची राहे महान।।2।।
गुरु देती प्रतिभा दूरदृष्टी बुद्धी कान
उन्हात-सावली निराशेत आशा किरण
देती बोधामृत स्मरूया गुरूंचे ऋण।।3।।
श्री अरुण गांगल.कर्जत रायगड. महाराष्ट्र.
पिन 410 201.
Cell.9373811677.
माझी 47 गाणी You tube वर”arungangal”या नांवाने टाकली आहेत.ऐकून आनंद घ्यावा.कविता,गाणी शेअर करण्यास हरकत नाही.