*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिक्षक*
शिक्षणाचे दान देतो
आणि विद्येचा रक्षक,
तोच असतो खरा
समाजाचा शिक्षक..।
घडत असतो ज्यांच्या
हाताखाली आपण,
आपल्या जीवनात जो
करतो समता स्थापन..।
सत्य असत्य शिकतो
निती आणिक अनिती,
शिक्षकाचे उपकार
आपणावर किती..।
खरा शिक्षक ठरतो
मार्गदर्शक गुरु,
ज्यांच्यामुळे आपुले
जगणे होते सुरु..।
गुरूर ब्रह्म गुरूर विष्णू
गुरूर देवो महेश्वरा,
आजच्या दिनी तयांना
वंदन करूनी स्मरा..।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*