*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री नंदिनी चांदवले यांचा शिक्षक दिनानिमित्त लिहिलेला अप्रतिम लेख*
*माझे आवडते गुरू*
आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन आपणा सर्वांना माहीतच आहे आज सर्व डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस. डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती .शिवाय उपराष्ट्रपती पदही त्यांनी भूषविले. राजकारणातलं हे सर्वोच्च पद पण राधाकृष्णन यांनी शेवटपर्यंत आदर्श शिक्षकाची भूमिका निभावली शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळेच त्यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने 1962 मध्ये घेतला . तेव्हापासून ५ सप्टेंबरला सर्वत्र शिक्षक दिन साजरा केला जातो इतर देशातही वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरे केले जातात.
आपल्या आयुष्यात शिक्षक, गुरु यांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे त्यामुळेच म्हणतात गुरुविण कोण दाखवील वाट आपल्या आयुष्याला योग्य वळण लावण्याचे कार्य शिक्षकांमुळेच होते असंही म्हणतात की आई हा आपला पहिला गुरु असतो पण बाहेरच्या जगात उदाहरणार्थ शाळेतील शिक्षक हेही आपले गुरु असतात प्रत्येकाला चांगले शिक्षक मिळाले तर चांगला नागरिक तयार होतो हे अगदी खरे आहे कारण मुलं संस्कारक्षम आणि अनुकरण शील असतात ते नेहमीच चांगल्या चा स्वीकार करतात आणि चांगल्या गोष्टींचे अनुकरण करतात यासाठी चांगला गुरु मिळणं हे आपल्या भाग्यात असावं लागतं.
मी ही शाळेत जाऊ लागले माझ्या सुदैवानं मला नेहमीच चांगले शिक्षक मिळाले चौथीच्या वर्गात असताना मला आ.गो. कामत हे शिक्षक मिळाले लाभले आणि ते माझे आवडते गुरु झाले माझे सर्व शिक्षण कोल्हापूर येथे झाले
आपल्या आयुष्यात गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे .ज्याना आपण गुरू मानतो त्यांच्या विषयी नितांत आदर वाटतो. खरे गुरू, मी गुरू तू शिष्य असे नाते मानत नाहीत.कारण शिष्यातही त्याना गुरू दिसतो. शिष्या कडूनही काही शिकण्यासाठी ते आतूर असतात
संसारात येणा-या अडचणींवर मात करण्यासाठी साठी ते आत्मिक बळ देतात. सध्या युट्युब वर गोंदवलेकर महाराजांचे प्रवचन दररोज प्रकाशित होत असते. थोडक्यात पण सुंदर विचार मांडले आहेत जे सध्या च्या परिस्थिती त दिलासा देऊ शकतील.मला वाटते जगात चांगले काहीतरी आहे म्हणूनच हे जग चाललंय.
आपला आद्यगुरू म्हणजे आई.आईवडिलानी केलेल्या संस्कारांमुळे आपण तरून जातो
म्हणूनच म्हणतात “आई माझा गुरू
सौख्याचा सागरू,आई माझी .पुढे आपण शाळेत जातो आणि शिक्षक हे आपले गुरू होतात.
मी कोल्हापूरला ताराराणी विद्यापीठ येथील प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात असताना मला आ.गो.कामत हे वर्ग शिक्षक लाभले. शाळेची प्रार्थना , हजेरी झाल्यावर पहायला अर्धा तास ते आम्हाला एखादी घटना, गोष्ट सांगत असत. शेवटी त्या घटनेला अनुसरून काही सूचना देत असत.मुलांनी केव्हा कसे वागावे
उदा.
नम्रतेने वागावे.नेहमी खरे बोलावे, मैत्रिणींशी अबोला धरू नये.दररोज अभ्यास करावा. दैनंदिनी लिहावी. घराची स्वच्छता राखावी, नखे काढावी, स्वच्छ कपडे वापरावे. दररोज स्वच्छ गणवेश घालावा. हे सर्व एखादी गोष्ट किंवा घटनेच्या आधारे समजावायचे इतकेच नाहीतर
मोठ्या माणसां समोर खुर्चीवर बसून नये. घरात कोणी आजारी असेल तर त्यांची सेवा करावी औषध द्यावे त्याना गोष्टी सांगाव्या. यानंतर मी स्वतः मोठे कोणी आले तर खुर्चीवरून उठायचे माझं वागणं घरच्यांच्या लक्षात आलं
त्या दरम्यान माझ्या भावाला टाॅयफाईड झाला.तेव्हा मी गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे केले. डाॅक्टरानी भावाच्या तापाची नोंद दर तीन तासांनी करायला सांगितले . तेव्हा मी ताप मोजायला शिकले व सर्व लिहून ठेवले भावाला गोष्टी सांगितल्या त्या ला सर्वतोपरी मदत केली.हे कोणामुळे
तर… गुरुजींनी शिकवले होते. कामत गुरूजी अतिशय शिस्तप्रिय.ते रोजचा गृहपाठ आवर्वजून तपासायचे त्यांच्या मुळे मला अभ्यासाची गोडी वाटू लागली. अभ्यासाची सवय लागली. साठ वर्ष लटून गेली तरी अजूनही या गोष्टी आठवतात.
खरच कमी वयातील मुलांना योग्य मार्गदर्शन मिळाले तर मुले नक्कीच सुसंस्कृत, सुस्वभावी बनतील वर्गात अभ्यास करून पुढे पुढे जाताना या संस्कारांची शिदोरी प्रत्येकाला मिळाली तर नक्कीच प्रत्येक विद्यार्थी
सुजाण नागरिक होईल. प्रत्येक शाळेत पहिला तास संस्कार वर्ग म्हणून ठेवावा असं मला मना पासून वाटतं
असे हे संस्काराची शिदोरी देणारे
माझे शिक्षक आ.गो. कामत माझे आवडते गुरू झाले. त्याना माझा शतशः प्रणाम!
आता काळ बदललाय सर्व कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने होत आहेत वाॅट्स अप ,फेसबूक शिकताना टेक्निकली अडचणी येतात तेव्हा घरातल्या लहानांनाही विचारावे लागते मैत्रिणीना विचारावे लागते आयुष्यात असे लहान मोठे गुरू भेटतात.आपल्याला मार्ग दाखवतात. उपदेश करतात त्यामुळेच आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व प्रसंगाना सामोरे जाऊ शकतो.
अशा लहान मोठ्या सर्व गुरूंच्या चरणी माझा मना पासून नमस्कार !
*गुरूर ब्रम्हां गुरूर विष्णू गुरूर देवो महेश्वरा*
*गुरू साक्षात परब्रह्म तस्मैसी गुरवे नमः*
नंदिनी प्रभाकर चांदवले .
औंधरोड पुणे .