You are currently viewing वेंगुर्ल्यात मठ येथील १५ वर्षीय मुलाच्या हातात फुटला ॲटमबॉम्ब

वेंगुर्ल्यात मठ येथील १५ वर्षीय मुलाच्या हातात फुटला ॲटमबॉम्ब

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील मठ येथील वैभव आईर या १५ वर्षीय मुलाच्या हातामध्ये रात्री पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन करताना ॲटमबॉम्ब फुटून अपघात झाला. यामध्ये त्याच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे. ओरोस येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर अधिक उपचार करण्यात आले.

मठ येथील पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन सुरू असताना मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. यातच वैभव मोठ्या उत्साहातमध्ये फटाके फोडत असताना अचानक ॲटमबॉम्ब लावताना एक ॲटमबॉम्ब लावता लावता त्याच्या हातात फुटला. तत्काळ त्याला वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्या हाताला जास्त मार लागल्याने प्राथमिक उपचार करून वैभव याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय घालवण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा