*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम लेख*
*🌿रंग हिरवा*🌿
शालू हिरवा ..पाचू नि मरवा
वेणी तिपेडी घाला..
हिरवाईचं अप्रूप किती वर्णावं! मनातील भावभावनात दाटलेलं हिरवेपण शब्दात जणू ओसंडून वाहतं..
स्रीच्या जीवनील आमुलाग्र बदलांचीही वेळ..पिवळी हळद हिरव्यागार आम्रपर्णांनी अंगाला लागते नववधूच्या..पिवळा झेंडू शोभतो तोरणातील कंच हिरव्या पानात आणि हिरव्यागार भरगच्च चुड्याने गोरेपान हात तू नवरी होणार ही सुखद जाणीव मनात पेरते.हिरव्या मरव्यासह अबोली,जाईजुई काळ्याभोर कुंतलात माळतांना साजण सहजच मनात डोकावू लागतो.
हिरव्या मेंदीची नाजूक नक्षी
झरझर तळहातावर रेखल्या जाते…
हिरव्या मंडपात हिरव्या पैठणीत जरतारी मोर आनंदगीत गाऊ लागतो.
सप्तपदीही रोज चालते
,तुझ्यासवे ते शतजन्मीचेरे माझे नाते…….!
काळी आई श्रावणधारांनी तृप्त होते..आणि पोटातील
अंकुर हळूच भुईचा पडदा वर उचलून जग बघू लागतात.कोवळी लुसलुशीत हिरवी पालवी
वार्यापावसासह धरेच्या कुशीत बागडू लागतात.रां हिरवं,शिवार हिरवं,झाडं हिरवी….सर्व सृष्टी रंगीत पुष्प लेऊन हिरवेपणाचं हसून स्वागत करतात.
काही पिवळी पानंदेखील
देठाजवळ हिरवी राहून हा नवसृजनाचा सोहळा बघत
पुनःप्रत्ययाचा आनंद घेतात.
हिरवा रंग मांगल्य, चैतन्याचा..सदैव प्रफुल्लित करणारा….रंगांचा राजा म्हणावं असाच…!
रंग निसर्गाने सगळ्यांसाठी दिलेले..जीवन अनेक रंगांनी खुलावं,बहरावं
संकटातून बाहेर यायला हे रंगच आधार होतात..मानवाला नैतिक मुल्य आहेत..बुध्दी आहे..
कुठल्याही कारणाने कोणताच रंग कुणाकडून हिरावू नये..ती परमेश्वर व निसर्गानेच आपल्याला दिली आहे.जीवनात रंग आहेत म्हणून आपलं अंतर्मन आनंदी आहे.
हिरव्या रंगासह मोरपिसासारखं अनेक रंग लेवून आपण कृष्णरूप होऊ या……!!!🙏🌹
☘️🍃☘️🌷☘️🍃🌷☘️
लेखन ..अरूणा दुद्दलवार
दिग्रस.यवतमाळ..