सौ कल्पना तेंडुलकर यांच्या घरातील गौरी
सिंधुदुर्ग :
श्री गणेशाच्या आगमनानंतर ज्येष्ठा गौरीचे आगमन होते. श्री गणेशाच्या माता गंगा आणि गौरी… पश्चिम महाराष्ट्रात याना महालक्ष्मी असे म्हणतात.
या गौरींची प्रतिष्ठापना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते… काही ठिकाणी गौरी चे मुखवटे आणून स्टॅंड वर उभ्या ठेवतात. कुणी बसलेल्या ठेवतात. कुणी नुसतेच मुखवटे ठेवतात. तर काही ठिकाणी तेरड्याचे झाड आणि हळकुंडाचे रोप तांब्यात पाणी घालून ठेवतात व त्याला गौरी स्वरूप मानतात….. प्रत्येकाच्या परंपरा, प्रथा वेगवेगळ्या असल्या तरी भक्ती भाव हा एकच असतो.
पहिल्या दिवशी गौरी ला पाणवठ्यावरून, विहिरी वरुन ते नसल्यास तुळशी वृंदावना जवळून वाजत गाजत घरी आणतात. जी महिला गौरी घेऊन येत तिचे पाय दुध व पाण्याने धुतले जातात. पायावर कुंकवाने स्वस्तीक काढायचे.
मग गौरी आली सोन्याच्या पावलांनी असे म्हणत सर्व घरातून मिरवतात. षोडशोपचार पूजा करून प्रतिष्ठापना करतात.. पहिल्या दिवशी भाजी भाकरी चा नैवेद्य दाखवतात. दुसऱ्या दिवशी साग्रसंगीत पुरणपोळी, सोळा भाज्या, सोळा कोशिंबीर, सोळा चटण्या.. आपल्या प्रथेनुसार करतात. विविध प्रकारचे लाडू, करंज्या चकली. शेव इत्यादी पदार्थांचे नैवेद्य दाखवतात.. या दिवशी हळ दी कुंकू करतात. गौरी माहेर वाशीन असते त्यामुळे तिला पाठवणी करताना. माहेराहून सर्व धान्य, कडधान्ये, विविध प्रकारचे खाद्य पदार्थ दिले जातात. गौरी खुप प्रसन्न दिसतात. तिसऱ्या दिवशी त्या जातात. जाताना त्या खुप उदास दिसतात. कोळी समाज गौरी ला मासे आणून त्या चा नैवेद्य दाखवतात.
असा हा गौरी चा सण साजरा करतात. आज ई संवाद शी संवाद साधताना सौ कल्पना तेंडुलकर यांनी ही माहिती दिली. गौरींच फोटो हा कल्पना तेंडुलकर यांच्या घरातील गौरींचा आहे.