सावंतवाडीतील लाकडी खेळण्यांचा विशिष्ट पोस्टकार्डवर समावेश…

सिंधुदुर्गनगरी :

1 ऑक्टोबर रोजी पोस्टकार्डचा 151 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या निमित्त पोस्टल विभागाने एका विशिष्ट पोस्टकार्डचे प्रकाशन पोस्टमास्तर जनरल गोवा क्षेत्राचे डॉ. विनोदकुमार यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती सिंधुदुर्ग विभागचे अधिक्षक डाकघर सिंधुदुर्गनगरी यांनी दिली.
देशातील हस्तकेलेचा सन्मान व्हावा यासाठी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, गुजरात, ओडीसा व कर्नाटक या राज्यातील हस्तकलेला विशिष्ट पोस्टकार्डचे  स्थान देण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्रामधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील प्रसिद्ध लाकडी खेळण्यांचा समावेश करण्यात आला आहे. हे पोस्टकार्ड ग्रीटींग स्वरुपात देखील पाठविता येण्यासारखे आहे. या पोस्टकार्डची फिलॅटेली अंतर्गत विक्री करण्यात येणार आहे. एका पोस्टकार्डची किंमत पोस्टेज लावून 25/- रुपये एवढी असून,  पोस्टेज न लावता 12/- रुपये अशी आहे. तसेच 12 पोस्ट कार्डच्या सेटची किंमत पोस्टेज लावून 300/- रुपये असून पोस्टेज न लावता 120/- रुपये आहे. या विशेष पोस्टकार्डची विक्री भारतभर करण्यात येणार आहे. त्यामुळे सावंतवाडी लाकडी खेळण्याची ओळख देशभर जाणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा