*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मानसी मोहन जोशी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गौरी आवाहन*
गणपतीच्या भेटीसाठी
गौरी आली ग माहेरी
झिम्मा फुगडी खेळू चला
शिण घालवू तिचा सारी
माहेराचे दिस गौरी
तुझे खेळात सरले
मांडवात डोळे बाई
भरभरून वाहिले
निघालीस सासुरला
डोळे भरुन वाहे पाणी
गौरी पंचमीला ये ग
म्हणू फेराचीच गाणी
संसारात गुंतलेली
लेक माहेरा धावली
तृप्त गौराई पाहून
थाट गणूचा आजोळी
सुखसमृद्धीचे दान
देते आईला गौराई
लेका घेऊन सासरी
जाण्या करतेय घाई
परतणी गौराईची
आई करताना हसे
माझी लेक संसारात
आनंदात दिसतसे..
सौ.मानसी मोहन जोशी…
ठाणे