ग्रामीण भागातील विद्यार्थी हळूहळू शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागले आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमांसोबत व्यावसायिक अभ्यासक्रमात सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची वर्णी लागत आहे. मु. पो. कवठणी (बोरभाटवाडी), ता. सिंधुदुर्ग, जि. सावंतवाडी मधील ग्रामस्थ श्री. शामसुंदर कवठणकर यांची कन्या, कुमारी. सायली शामसुंदर कवठणकर यांनी एलएलबी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक, श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांच्यामार्फत शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
“ग्रामीण भागातील विद्यार्थी अशाच प्रकारे व्यावसायिक अभ्यासक्रमात सुद्धा पुढे येऊन आपल्या गावाचे नाव व कुटुंबाचे नाव मोठे करतील व खासकरून कुमारी. सायली कवठणकर ही माझ्या कवठणी (बोरभाटवाडी) मधील शेजारी व घरचे संबंध असल्या कारणाने तिने मिळवलेले यश येत्या भविष्यात कायदा क्षेत्रामध्ये उज्वल करिअरच्या अनुषंगाने उपयुक्त ठरेल व प्रशासकीय स्वराज्य निर्माण होण्याच्या हेतूने तिचे सुद्धा योगदान समाजाला प्राप्त होईल” असे प्रतिपादन माननीय श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांच्यामार्फत करण्यात आले. यावेळी तिमिरातूनी तेजाकडे संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन यशवंत रेडकर व कवठणकर कुटुंबीय उपस्थित होते.