सोलापूर
मिशन आयएएस ही चळवळ राबविणारी अमरावतीची डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात गेल्या बावीस वर्षापासून अतिशय उत्तम काम करीत असून ही चळवळ बळकट करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे असे उद्गार सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व डॉ. पंजाबराव देशमुख आयएस अकादमीचे हितचिंतक मा. श्री .दिलीप स्वामी यांनी सोलापूर येथे काढले .
सोलापूर जिल्ह्यातील युवक बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन सोलापूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा कार्यशाळा,स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे प्रदर्शन, व्याख्यानमाला आदीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी मिशन आयएएस या चळवळीचे प्रणेते प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यासाठी श्री दिलीप स्वामी यांनी सोलापूर जिल्ह्यातील युवकांसाठी हा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे .याप्रसंगी डाँ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी या प्रकल्पाची जुनियर आयएएस ह्या दुसऱ्या वर्गापासून प्रशिक्षण देणाऱ्या उपक्रमाची माहिती श्री काठोळे यांनी दिलीप स्वामी यांना दिली. तसेच या उपक्रमांचा पुस्तकांचा संच देखील त्यांना सप्रेम भेट दिला . प्रशासनाने पुढाकार घेऊन प्रा. डॉ.काठोळे यांच्या स्पर्धा परीक्षा कार्यशाळा सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सुरुवातीला तालुक्याचे ठिकाणी असलेल्या अभ्यासिका शाळा व महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे .या उपक्रमाची सुरुवात मंगळवेढा व माळशिरस या तालुक्याच्या ठिकाणी प्रा. डॉ काठोळे यांच्या कार्यशाळांना प्रारंभ करून या उपक्रमाची रितसर सुरुवात झालेली आहे .श्री दिलीप स्वामी यांनी आपल्या निवासस्थानी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल प्रा.डॉ काठोळे यांचा सत्कार ही आयोजित केला होता. मी कुठे जरी असलो तरी मिशन आयएएस या चळवळीशी कटीबद्ध आहे असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी केले. विशेष म्हणजे 22 वर्षांपूर्वी अमरावतीला परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी असताना श्री दिलीप स्वामी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी चे उद्घाटन केले होते .आपण स्थापन केलेली चळवळ इतक्या वेगाने संपूर्ण भारतात पसरल्याबद्दल त्यांनी याप्रसंगी समाधान व्यक्त केले.
============== प्रकाशनार्थ
*प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे*
संचालक डाँ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी अमरावती.