जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका अभिनेत्री सोनाल गोडबोले लिखित अप्रतिम लेख
… बाप्पाचा नैवेद्य…..
बरेच जण म्हणतात देव कुठे खातो सगळं आपण आपल्यासाठीच करतो हे अगदी खरय पण देवापाशी जेव्हा आपण भोग चढवतो त्यावेळी वाहणाऱ्या तुळ्स ,दुर्वा यांनी अन्न निर्जंतुक होतं .. म्हटल्या जाणाऱ्या मंत्रानी अन्नावर चांगले संस्कार होतात.. तो नैवेद्य घरातील कोणीही खायचा असतो…
मैत्रीणीने तिच्या घरचा सांगितलेला किस्सा सांगते.. तिच्या सासूबाई स्वयंपाक करत होत्या तितक्यात तिच्या लहान मुलाने भुक लागली म्हणुन मोदकाच्या सारणात हात घातला तिने हातावर चापटी मारुन त्याला गप्प केलं.. मुलगा रडायला लागला कारण त्याला देव, नैवेद्य काहीच कळत नव्हतं.. खरं तर देव त्या निरागस जीवातच होता.. त्याला जर का तिने खाऊ दिला असता तर तो शांत झाला असता पण न जाणुन घेता आपण रुढी,,परंपरा पाळतो आणि ज्याच्यासाठी हे सगळं करतो त्याचा काही उपयोग होत नाही कारण अर्धवट माहीतीच्या आधारावर हे सगळं पिढ्यानपिढ्या सुरु असतं.. त्याहीपुढे जाऊन तो नैवेद्य तसाच देवापुढे ठेवते आणि दुसऱ्या दिवशी तो फेकुन देते .. ती गायीला देउ शकते किवा कुठल्याही प्राण्याला,,पक्षाला घालु शकते किवा स्वतः घरात खाऊ शकते मग अन्नाचा अपमान करुन त्या बाळालाही न खाऊ देउन त्यांना काय मिळतं?? .. त्याचप्रमाणे देवासमोर ठेवलेली विड्याची पाने. सुपारी ,फळे , खारीक या वस्तु एकतर स्वतः खा किवा कोणालाही द्या त्या पाण्यात विसर्जन करु नका..कोण तरी म्हणालं तुम्ही दरवाजा बंद करुन आलात ?? घरी गणपती आहे ना?? .. घरी फक्त मूर्ती आहे हो देव आपल्यात आहे तोच घेउन फिरतोय .. तो आहे चांगल्या विचारात , तो आहे लोकांसाठी उपयोगी पडण्यात .. आणि शहरात दोन माणसे घरात असल्याने नोकरीसाठी ते बाहेर पडणारच ते ५ दिवस घरात बसु नाही शकत.. गावाकडे मोठ्या कुटुंबात ते शक्य आहे.. नको त्या गोष्टी आपल्या मनात इतक्या खोलवर गेलेल्या असतात की यातुन काहीतरी चांगला विचार असु शकतो हेच लक्षात येत नाही.. आरती चा अर्थ आहे आर्तता.. त्यामुळे ती योग्य शब्दातच व्यक्त व्हायला हवी .. मंत्रपुष्पांजली ला अर्थ आहे त्यामुळे ते शब्द उच्चारताना योग्य ठिकाणी तोडता यायला हवेत.. यावर काम करणं गरजेचं आहे .. अर्थ नसलेल्या गोष्टीत नाही.. जाणुन घ्या आपल्या पुर्वजानी हे सगळं का आणि कशासाठी केलं असेल ?? …
सोनल गोडबोले
लेखिका..अभिनेत्री
8380087262