*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ढोलताशा ..! गणनायका..!*
चांदण वैभव घेवून शरद
उंबरठ्यावर उभा राहतो
बाऊ करीत श्रावणाचं
आषाढ अंगात येतो…..!
फुकून मंत्र चांदण शारदाचं
सृष्टीला प्रवचन देत बसत
रात्रीची वाट बघत मग
दिवसाला अबोला घेत ..!
सावळीत सावळी होत
श्रावणांत अष्टमी उगवते
बाळकृष्णाच्या लीलांनी
रंगून निळी होत जाते ..!
ढोलताश्यांच्या गजरात
धून मुरलीची मागे पडते
श्री गणेशाच्या आगमनाने
गोपाळकाल्यास! मोदक भरवते..!
चतुर्भुज दंड पाशाकुंशध्वज आगमन
कटि पितांबर गौरांगावर मूर्त तुझी
गणनायका !अणुगर्भी तृणदर्भी दर्शन
शुभंकरा ज्योतिर्मय आभा तुझी..!
बाबा ठाकूर