You are currently viewing मागती आज्ञा रुक्मिणीवरा

मागती आज्ञा रुक्मिणीवरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अरविंद ढवळीकर यांनी आज ऋषींपंचमी शेगाव चे संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा समाधी दिन निमित्ताने लिहिलेली काव्यरचना*

*मागती आज्ञा रुक्मिणीवरा*

आषाढीसी संत गजानन येती पंढरपूरा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

तुझ्याच आज्ञे भ्रमण भूवर
जे जे होते भाविक नरवर
पूर्ण करविले मनोरथांना देऊन त्या आसरा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

ध्येय विषय तू या संतांचा
कल्पतरू साऱ्या भक्तांचा
तूच आत्मा वेद विधीचा मजला मुक्त करा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

कार्य सम्पले अवताराचे
वैकुंठासी परत जायचे
तव चरणासी निवास अक्षय अखंड लाभो खरा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

हात जोडले विरह हरीचा
संत गहिंवरे शेगावीचा
अश्रू लोचनी कंठ दाटला भक्तां पाहून जरा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

निरोप द्यावा भाद्रपदासी
काया मूर्ती बोळविण्यासि
उभा विटेवरी हात कटीवरी घेसी दीन कैवारा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

आषाढीसी संत गजानन येती पंढरपुरा
मागती आज्ञा रुक्मिणीवरा

अरविंद
20/7/21

प्रतिक्रिया व्यक्त करा