जेव्हा तू बाप होशीत…
तेव्हाच तुका समजात…
मुलाक जन्म देताना,
बायकोचा तळमळना,
बापसाच्या मनातली काळजी,
तेच्या जीवाची होणारी घालमेल,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
तुझा पहिल्यांदा रडना ऐकून,
बापसाच्या डोळ्यातला पाणी,
बापसान तुका तळहातावर घेताना
अश्रू आणि हसू हेंचो मिलाफ,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
हाताची दोन बोटा धरून,
धडपडत चालताना पडल्यावर,
तुझ्या रडणाऱ्या चेहऱ्याकडे बघून,
बापसाचा काळीज पिळवटना,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
शाळेत तुका सोडून येताना,
‘बाबा, नको माका सोडून जाऊ’
अशी तू आर्त हाक ऐकताना,
बापसाच्या हृदयाक होणारी वेदना
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
तुझे छोटे मोठे हट्ट पुरवताना,
बापसाची होणारी दमछाक,
दिवसभर थकून इल्यावर सुद्धा,
तुका आनंदानं मिठीत घेणा,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
तुका कॉलेजात पाठवताना,
जीव मारून तुझ्यासाठी पैसे साठवताना,
स्वतः वेळेक चालत जाऊन,
तुझ्या गाडीची केलेली सोय,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
मित्रांसोबत मजा मारताना,
वाटात तसे पैसे उधळताना,
पैसे कमवतानाचे बापसाचे श्रम,
घाम गाळूनही केलेली काटकसर,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
तू दिवसा रात्री बाहेर असताना,
तुझो फोन लागत नसता तेव्हा,
घरात बसून तुझी वाट बघताना,
बापसाच्या मनात येणारो विचार,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!
तुझे केलेले लाड, पुरवलेले हट्ट,
तुझ्यावर असणारा निस्सिम प्रेम,
बापूस असताना बापसाची किंमत,
बाप गेल्यावर बापसाची कमी,
तेव्हाच तुका समजात,,,
जेव्हा तू बाप होशीत…!!
(दिपी)
दीपक पटेकर
९४२१२३७५६८