*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री मृणाल प्रभुणे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*साठीनंतर*
*साठीनंतर पुन्हा एकदा खरंखुरं जगू*
*जीवनाकडे पुन्हा एकदा नव्याने बघू..*
लहानपण, तरुणपण पुन्हा एकदा शोधू
दंगामस्ती करत वाद उगाचच घालू..
कोट्या करून, हसून टाळी देवू घेवू
आनंदाने तरंगत फुलपाखरे होवू..
*साठीनंतर पुन्हा एकदा खरंखुरं जगू…*
*जीवनाकडे पुन्हा एकदा नव्याने बघू..*
हसण्याच्या वर्गालाही न जाता
मनमोकळं खळखळून हसू..
शरदाचं चांदणं नव्याने पाहू
वय विसरून आनंदाला उधाण आणू..
*साठीनंतर पुन्हा एकदा खरंखुरं जगू…*
*जीवनाकडे पुन्हा एकदा नव्याने बघू..*
नको चिंता, नको निराशा
उदासिनता दूर सारू
आजारपणाची ऐशीतैशी
हसण्या खिदळण्यात गुंडाळू ..
*साठीनंतर पुन्हा एकदा खरंखुरं जगू…*
*जीवनाकडे पुन्हा एकदा नव्याने बघू..*
मृणाल प्रभुणे
नाशिक.