पुढील वर्षअखेरपर्यंत गावागावातही पोचणार सेवा..
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने सोमवारी ४५ व्या वार्षि सर्वसाधारण सभेत ५-जी सेवा सुरू करण्याची घोषणा केली. येत्या ऑक्टोंबरपासून म्हणजेच दिवाळीत मेट्रो शहरांपासून ५ जी सेवेचा धुमधडाक्यात प्रारंभ सुरू होऊन २०२३ पर्यंत ही सेवा संपूर्ण भारतात उपलब्ध होईल, असे कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. याचदरम्यान, आता आकाश अंबानी जिओ, ईशा अंबानी ‘रिटेल’ आणि अनंत अंबानी ‘न्यू’ एनर्जी बिजनेस ची जबाबदारी हाताळणे असल्याचेही स्पष्ट केले.
रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत गुंतवणूकदारांसमोर बोलताना मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या कामगिरीचा आढावा मांडताना भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्या. जिओ ५ जी हे जगातील सर्वात मोठे आणि सर्वात प्रगत नेटवर्क असेल, असे स्पष्ट केले. कंपनी ५ जी सेवेसाठी २ लाख रुपये कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनी दिवाळीपर्यंत दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकत्ता यासह अनेक मोठ्या शहरांमध्ये ५ जी लॉच करणार आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात ५ जी सेवा विस्तारेल. हे जाळे विस्तारण्यासाठी कंपनीने मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि इंटेलसोबतही भागीदारी केली आहे. असे सांगण्यात आले ही सेवा देतानाच त्यासाठी अत्यावश्यक असलेला स्मार्टफोन या वर्षाच्या अखेरीस लॉन्च केला जाईल, असे संकेतही देण्यात आले. या स्मार्टफोनचे संभाव्य किंमत १० ते १२ हजार रुपये असू शकते.