नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी मोठी बातमी आहे. NEET परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. ७ सप्टेंबर रोजी हा निकाल लागणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने याबाबत माहिती दिली आहे.
विद्यार्थ्यांना दिलेल्या ईमेल आयडीवर उत्तर की, OMR शीट्स रिलीझ करण्याबाबत अपडेट मिळेल. एकदा जाहीर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर ती संधी दिली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निकाल ७ सप्टेंबरपर्यंत येईल अशी माहिती मिळाली आहे.
एनटीएद्वारे जारी केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या उत्तर की वर विद्यार्थी आक्षेप घेऊ शकतात. तक्रारीची नोंद करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी २०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. शुल्क ऑनलाइन भरावे लागणार आहे. फी न भरता घेतलेल्या आक्षेपांचा विचार केला जाणार नाही.
▪️सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी एनटीए एनईईटीच्या अधिकृत वेबसाइटवर neet.nta.nic.in जावे
▪️यानंतर होम पेजवर दिलेल्या नीट यूजी २०२२ निकालाच्या लिंकवर क्लिक करा
▪️आता मागितलेले आवश्यक क्रेडेन्शियल्स भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
▪️यानंतर तुमचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
▪️निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवा.
देशातील एकूण १८, ७२, ३२९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. त्यापैकी १०.६४ विद्यार्थीनी असल्याची माहिती मिळाली आहे. देशात नीटसाठी पहिल्यांदाच १८ लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. याचे निकाल ३० ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर रोजी येणार आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल आता जाहीर होणार आहे.