You are currently viewing आजकाल

आजकाल

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री रेखा काळे लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आजकाल*

आजकाल प्रत्येकाला
असते फारच घाई
कोणासाठी थांबायला
वेळच मिळत नाही ‌ !!

स्वार्थ वाढला मनात
पैशाची हाव सुटली
पैशामागे धावताना
रक्ताची नाती तुटली. !!

सेवा, परोपकार शब्द
नावापुरते राहिले
स्वतःचा फायद्यासाठी
इतरांचे गुण गाईले !!

मोबाईल प्रिय सखा
रात्रंदिन सोबतीला
घरात एकत्र राहून
वेळ नाही बोलायला!!

तंत्रज्ञानाच्या युगात
आधुनिक प्रत्येकजण
संसार आणि संस्कृती
हरवून गेले मन

भ्रष्टाचार, महागाईने
कंबरडं मोडल गरीबांचे
चैनविलासात मग्न
पोरसोर धनिकांचे !!

आजकाल बदलली
सगळीकडे परिस्थिती
नितीमत्तेने वागुन
जपू आपली मनस्थिती !!

रेखा काळे
अहमदनगर

प्रतिक्रिया व्यक्त करा