कणकवली
मंदिर बंद…उघडले बार….उद्धवा…धुंद तुझे सरकार..याच्या विरोधात तसेच मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीकरीता भारतीय जनता पार्टी, कणकवली यांच्या वतीने मंगळवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी उपविभागीय अधिकारी (प्रांत) ऑफिस कणकवली येथे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील अनेक कलावंत भाविक जनतेला आवाहन करीत आहेत की या लाक्षणिक उपोषणास कणकवली येथे सक्रिय सहभागी व्हावे.