You are currently viewing सावंतवाडीच्या आमसभेच्या तारखेत बदल

सावंतवाडीच्या आमसभेच्या तारखेत बदल

गटविकास अधिकाऱ्यांची माहिती; ९ ऐवजी आता १२ सप्टेंबरला होणार सभा…

सावंतवाडी

ऐन अनंत चतुर्थी दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडीतील आमसभेला विरोध झाल्याने ही आमसभा आता ९ सप्टेंबर ऐवजी आता १२ तारखेला होणार आहे. याबाबत सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. तब्बल सात वर्षांनी ही सभा होणार आहे. शालेय शिक्षण तथा पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली येथील वैश्य भवन सभागृहात सकाळी साडे दहा वाजता ही सभा होणार आहे. त्यामुळे या सभेला सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन पंचायत सिमतीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा