You are currently viewing महीलावर होणारे अत्याचार थांबवा वैभववाडी भाजपा महीला मोर्चा चे तहसिलदारांना निवेदन…

महीलावर होणारे अत्याचार थांबवा वैभववाडी भाजपा महीला मोर्चा चे तहसिलदारांना निवेदन…

वैभववाडी :

शासनाचा प्रशासनावर कोणताही अंकुश नसल्यामुळे महिला अत्याचाराच्या घटना राज्यात घडत आहेत. महीलावर होणाऱ्या अन्यायाविरोधात योग्य पावले शासनाने उचलावीत. व महिला सुरक्षेबाबत कडक कायदे बनविण्यात यावेत. या मागणीचे निवेदन वैभववाडी भाजपा महिला मोर्चा च्या वतीने तहसीलदार रामदास झळके यांच्याकडे सादर करण्यात आले आहे.

राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र राज्यात सुरू आहे. कोरोना सेंटर व हॉस्पिटलमध्ये महिलावर अत्याचार होत आहेत. या प्रत्येक घटनेतील दोषींवर कारवाई व्हावी याचा पाठपुरावा भाजपा महिला मोर्चाने केला आहे. वेळोवेळी कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र ठाकरे सरकार यांनी याकडे लक्ष दिले नाही. या घटनांना सरकार गांभीर्याने घेत नाही. 22 सप्टेंबर रोजी या सरकारच्या विरोधात एक दिवशी आंदोलन छेडण्यात आले होते. तरीही सरकारने पावले उचलली नाहीत. असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देतेवेळी महिला अध्यक्ष भारती रावराणे, समाज कल्याण सभापती शारदा कांबळे, पं.स.सभापती अक्षता डाफळे, नगराध्यक्षा समिता कुडाळकर, माजी सभापती शुभांगी पवार, पं.स. सदस्य हर्षदा हरयाण, प्राची तावडे, स्नेहलता चोरगे, सुप्रिया तांबे व महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा