You are currently viewing नक्की कोण भ्रष्ट….

नक्की कोण भ्रष्ट….

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री बियोंड सेक्स कादंबरीकार सोनल गोल्डबोले लिखित अप्रतिम लेख*

*नक्की कोण भ्रष्ट….*

खरं तर ही अनेक बिल्डींगची कहाणी आहे .. पण माझ्या नातेवाईकांकडुन ऐकायला मिळालेली स्टोरी… बिल्डींग फार काही जुनी नाही.. पण नवीन असल्यापासूनच गळतेय, एक दोन फ्लॅट सोडले तर सगळीकडे पोपडे निघालेत.. प्रत्येक घरात ओल आहे…
हे का असेल माहीत आहे?? … कारण आपणच भ्रष्ट आहोत.. बॅकेतील काही मंडळीनी बिल्डरला लोन पास केलं त्याबदल्यात त्याच्याकडुन खुप कमी दरात फ्लॅट विकत घेतले.. खरं तर बिल्डरला रेट कमी करणं पऱवडणारं नव्हतं पण त्याचाही नाईलाज होता कारण त्याला बॅंकेकडून कर्ज मिळालं नसतं तर त्याचं स्वप्न पूर्ण होणार नव्हतं आणि कमी दरात फ्लॅट घेतल्याचा आनंद यांना मिळणार होता.. पण या सो कॉल्ड बॅंकवाल्याना हे माहीत असायला हवं की बिल्डर दर कमी करणार म्हणजे मटेरीयल कमी दर्जाचं वापरणार .. आम्ही या दरात घेतला तुम्हांला महाग मिळाला हे काही लोकांना टोमणेही ऐकवले पण आज त्यांना कित्येकदा वॉटर पृफिन्गवर हजारो रुपये खर्च करावे लागले म्हणजेच काय जे वाचवले होते ते गेलेच पण घराला कायमच गळती लागली.. कितीही कोणाचं खा तो आनंद क्ष्णीक असतं .. ते पचत नाही हेच खरं… आपल्याला सगळं माहीत असतं पण आपण त्याकडे कानाडोळा करतो.. काय होतय ?? .. अनेक लोक खातात त्यांना पचतं हे डायलॉग ऐकु येतात.. पण हे खरच आहे का ?? पुढे जाऊन तो बिल्डर डुबतो ,,आत्महत्या करतो , आयुष्यातुन उठतो याला जबाबदार नकळत आपणच असतो.. शुल्लक रक्कम वाचवली या नादात आपण अनेक आयुष्य उध्वस्त करतो..
आपण ज्या घरात खुशाल झोपतो ती खरच पवित्र आहे का ?? की वास्तुशांत करुन मनाची समजुत करुन पवित्र केलेय.. जरुर विचार करायला हवा.. अवतीभवती रोज अनेक घटना घडत असतात त्यातुन आपण काय शिकतो याचाही विचार व्हायलाच हवा ना..एक प्लॉट अनेकांना विकुन त्यातुन पैसे मिळवायचे आणि मग तिच व्यक्ती आत्महत्या करते.. यात सुख आहे कुठे?? .. सुख हवं म्हणुन आपण हे करतो पण दुसऱ्याला त्रास देउन खरच सुख मिळतं?? .. सगळं कळतं तरीही आपण चांगले का वागत नाही ?? वेळ गेलेली नाही अजूनही विचार करुयात ..

सोनल गोडबोले
८३८००८७२६२
लेखिका,,अभिनेत्री

प्रतिक्रिया व्यक्त करा