You are currently viewing नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवलराज काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जन्मभूमी सडुरे येथे संपन्न झालेल्या आरोग्य शिबिरास 80 हून अधिक लाभार्थ्यांनी केली डोळे तपासणी तर 35 जणांनी केली रक्त तपासणी

गणेशचतुर्थी नंतर 5 जणांच्या डोळे (मोतीबिंदू) वरती ओरोस येथे होणार मोफत शस्त्रक्रिया

पंचक्रोशीतील चार गावचे सरपंच, प्रतिष्ठित नागरिक यांच्या सहित जिल्ह्यातून अनेक मान्यवरांची उपस्थिती

वैभववाडी

दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करून जनतेला सेवा देण्याचे काम सामाजिक कार्यकर्ते श्री नवलराज काळे यांच्या माध्यमातून होत असते. त्याचप्रमाणे यावर्षी देखील नवलराज काळे यांच्या वाढदिवसाचे औचित साधून श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग, ग्रामीण आरोग्य फाउंडेशन सिंधुदुर्ग, कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट ग्रामीण रुग्णालय सिंधुदुर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्र (सडूरे) वैभववाडी व हिंद लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने श्री नवलराज विजयसिंह काळे यांच्या संकल्पनेतून आयोजित केलेल्या डोळे (मोतीबिंदू) तपासणी, रक्त तपासणी ब्लड प्रेशर तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक सत्कार व वडिलांचे छत्र हरवलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील सहा विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप कार्यक्रम आयोजन करून 25 ऑगस्ट 2022 रोजी 30 वा वाढदिवस सडूरे येथील विकास विद्यालय सडूरे अरुळे या प्रशालेमध्ये मान्यवरांच्या व जनतेच्या साक्षीने मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वराज्य संस्थापक छ.शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
श्री नवलराज विजयसिंह काळे हे सडुरे शिराळे ग्रामपंचायतचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष, श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष, सडुरे शिराळे विकास मंच संस्थापक अध्यक्ष तथा वैभववाडी तालुका विकास मंच स्थानिक संपर्कप्रमुख सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य व विविध सामाजिक संस्थेच्या पदांवरती कार्यरत आहे. नवलराज काळे ज्या ज्या पदावर ती काम करत आहे त्या त्या पदाला ते न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात त्यामुळेच ज्या विभागात, ज्या पक्षात, ज्या संघटनेमध्ये,ज्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्या क्षेत्रातील सर्वच मान्यवर या कार्यक्रमाला नवलराज काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले होते.
सदर आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात तब्बल 80 हून अधिक जणांनी आपले डोळे ब्लड प्रेशर तपासणी करून घेतली. त्यामध्ये 5 जणांच्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आढळून आला. या 5 ही जणांना गणेश चतुर्थी नंतर ओरोस येथील ग्रामीण रुग्णालय नेत्र विभाग येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी बोलवणार आहेत. तर 8 ते 9 जणांना डोळ्यांचा नंबर लागलेल्याचे निदान झाले आहे. शाळकरी व कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत चष्मा मिळणार आहेत. त्याचप्रमाणे या शिबिरादरम्यान ब्लड प्रेशर व रक्त तपासणी शिबिराला देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जवळपास 35 जणांनी आपले रक्त नमुना तपासणी मध्ये सहभाग नोंदवला आहे या तपासणीमध्ये हिमोग्लोबिन, पांढऱ्या पेशी, तांबड्या पेशी, प्लेटलेट कॅन्सर टेस्ट, थायरॉईड, कॅल्शियम, शुगर तीन महिन्याचा कंट्रोल रूटीन चेकअप, अशा प्रकारच्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. सदर घेतलेल्या रक्त नमुन्यांचे अहवाल (Report) लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातील. ज्या लाभार्थ्यांच्या रक्त नमुना अहवाला मध्ये काही कमी जास्त निदान झाल्यास त्या लाभार्थ्याला पुढील उपचारासाठी श्री नवलराज काळे यांच्याकडून सर्व वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांच्या मार्फत योग्य मार्गदर्शन केले जाईल. व त्यांना पुढील उपचारासाठी मार्ग दिला जाईल. त्याचप्रमाणे जनतेच्या सहकार्यातून सार्वत्रिक निवडणुकीत 2017 रोजी नवलराज काळे ग्रामपंचायत सडूरे शिराळे मधील प्रभाग क्रमांक एक मधून बिनविरोध ग्रा.प सदस्य म्हणून निवडून आले त्या प्रभागातील ज्या विद्यार्थ्यांचे वडिलांचे छत्र हरवले आहे अशा 5 विद्यार्थ्यांना तर प्रभाग क्रमांक तीन मधील शिराळे गावातील 1 विद्यार्थ्याला असे एकूण सहा विद्यार्थ्यांना श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी आपल्या 30 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी सदर कार्यक्रमांमध्ये गावातील ज्येष्ठ नागरिकांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच विविध विभागातून सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील राजकीय क्षेत्रातील सदर कार्यक्रमाला नवलराज काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित मान्यवरांचा मित्र परिवाराचा देखील सन्मान नवलराज काळे यांचे वडील विजयसिंह काळे, आई सुरेखा काळे भाऊ ॲड.विक्रमसिंह काळे, पत्नी विशाखा काळे यांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम भाजप नेते अरुळे गावचे सरपंच पत्रकार उज्वल नारकर यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री नवलराज काळे, यावेळी भाजप नेते अरुळे गावचे सरपंच उज्वल नारकर(पत्रकार),संस्थापक अध्यक्ष कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट ,उपाध्यक्ष महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तथा उपाध्यक्ष अखिल भारतीय कॅरम फेडरेशन भाजप नेते बाळा गोसावी, नाधवडे हायस्कूलचे शिक्षक टी एस पाटील सर, भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे व इतर मान्यवर यांनी आपल्या भाषणातून नवलराज काळे यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काटकर सर यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नवलराज काळे यांचे पिताश्री श्री विजयसिंह विठ्ठल काळे यांनी केले. या कार्यक्रमाला वैभववाडी तालुक्यातून सडूरे शिराळे, अरुळे,निमअरुळे, सांगुळवाडी, मगामवाडी,नावळे,खांबाळे,कुर्ली,अचीर्णे,कोळपे,कोकिसरे, नाधवडे,करुळ,कणकवली तालुक्यातून तळेरे कासार्डे नांदगाव,फोंडा, शेर्पे सहित सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच विभागातून विविध तालुक्यातील काही लाभार्थ्यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थितांना चहा नाश्ता देऊन डोळे तपासणी शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष महाराष्ट्र कॅरम असोसिएशन तथा उपाध्यक्ष अखिल भारतीय कॅरम फेडरेशन भाजप नेते बाळा गोसावी, ग्रामीण आरोग्य फाउंडेशन सिंधुदुर्ग चे संस्थापक अध्यक्ष श्री कृष्णा पाटील पाटील, नाधावडे स्कूलचे प्राध्यापक डी. एस पाटील सर,भाजप भटके विमुक्त आघाडी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघ अध्यक्ष किरण चव्हाण, जिल्हा सरचिटणीस शशिकांत इंगळे, भाजप भटके विमुक्त आघाडी वैभववाडी तालुका अध्यक्ष मारुती मोहिते ,सडूरे शिराळे सरपंच संतोष पाटील, अरूळे सरपंच उज्वल नारकर, निम अरुळे सरपंच सविता कदम, सडूरे शिराळे ग्रामपंचायत सदस्य आकांक्षा जंगम, माजी उपसरपंच वैशाली सावंत, भाजप भटके विमुक्त आघाडी लोकसभा संपर्कप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हा कार्यकारी सदस्य रवींद्र चव्हाण, सिव्हिल इंजिनियर (शासकीय ठेकेदार) श्री रामचंद्र बावदाने, भाजप युवा नेते राजू इंगळे, सडुरे गावचे तंटामुक्त अध्यक्ष दीपक चव्हाण, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, सत्कारमूर्ती गावचे ज्येष्ठ नागरिक सहदेव पाटील, केशव राऊत, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ, महेंद्रकर सर, नेत्र तपासणी चिकिस्तक डॉ.चेतन कोरे, डॉ.कौस्तुभ देशपांडे, आरोग्य सेविका शितल चाफे, हिंद लॅबच्या टेक्निशन आस्मा लांजेकर, विकास विद्यालय सडूरे शिराळे प्रशालेचे शिक्षक काटकर सर, चव्हाणवाडी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक कांबळे सर, कुर्ली प्राथमिक शाळा शिक्षक साबळे सर,तांबळघाठी प्राथमिक शाळेचे शिक्षक भैरळे सर प्राथमिक, सडूरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक कुवर सर, आरोग्य केंद्राचे फार्मासिस्ट श्री पाटील, श्री नवलराज काळे यांचे वडील विजयसिंह काळे मातोश्री सुरेखा काळे, पत्नी विशाखा काळे बंधू ॲड. विक्रमसिंह काळे,मेहुणे अथर्व जंगले, चुलत बहीण Civil Er. ज्योती काळे, मित्र परिवारातून अनिल राणे, गणेश जंगम,अनिकेत हेळेकर,अशोक पाटील जेष्ठ नागरिक दशरथ पडवळ, बाबुराव रावराणे,आकाराम बोडेकर, जनार्दन बोडके,दिपक भावे, परशुराम डांगे, मधुकर सावंत, भगवान बोडेकर, श्री चंद्रकांत डेळेकर, कोंडुबाई शेळके, रामचंद्र बोडेकर, अरुण चव्हाण, सुनंदा चव्हाण, सहकारी मित्र ज्ञानेश्वर पवार,मोहन जंगम, महेश डेळेकर, मंगेश चव्हाण,शैलेश मयेकर, अनिकेत मयेकर यांच्यासह असंख्य ग्रामस्थ माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी *नवलराज काळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है* अशा घोषणा देत टाळ्यांच्या गजरात सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळा पार पाडला. नवलराज काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राबवलेल्या सामाजिक उपक्रम बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडिया वरती देखील नवलराज काळे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग ला आतापर्यंत ज्या ज्या देणगीदारांनी देणगी दिलेली आहे त्या सर्वांचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री नवलराज काळे यांनी आभार व्यक्त केले आहेत. व कार्यक्रमाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या हातभार लावणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे देखील त्यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा