You are currently viewing कविहृदयाचे अमरावतीचे विभागीय आयुक्त श्री.दिलीप पांढरपट्टे यांची प्रमुख उपस्थिती

कविहृदयाचे अमरावतीचे विभागीय आयुक्त श्री.दिलीप पांढरपट्टे यांची प्रमुख उपस्थिती

कविहृदयाचे अमरावतीचे विभागीय आयुक्त श्री.दिलीप पांढरपट्टे यांची प्रमुख उपस्थिती

अमरावती
अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनामध्ये शनिवार दिनांक 27 रोजी सायंकाळी सात वाजता गझल नवाज श्री भीमराव पांचाळे यांचा गझल गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा विनामूल्य कार्यक्रम प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी आयोजित केलेला आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला माननीय श्री भीमराव पांचाळे यांचे जिवलग मित्र व आपल्या साहित्य सामाजिक व प्रशासकीय कार्यामुळे आपला आगळावेगळा ठसा उमटवणारे कविहृदयाचे अमरावतीचे नवनियुक्त विभागीय आयुक्त श्री दिलीप पांढरपट्टे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत .प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एक चांगला उपक्रम आयोजित केल्याबद्दल ते धन्यवाद पात्र आहेत. कोरोनाच्या काळानंतर श्री भीमराव पांचाळे यांची ही मोठी मैफल अमरावती शहरांना पर्वणीच ठरणार आहे. खरं म्हणजे अमरावती शहराला फार मोठा सांस्कृतिक वारसा आहे .विदर्भ साहित्य संघाची स्थापना अमरावतीला झाली आहे .याशिवाय साहित्य संगम साहित्य मित्र सिद्धार्थ साहित्य संघ अंकुर साहित्य संघ अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अशी कितीतरी नाव या चळवळीच्या संदर्भात घेता येतील. साहित्याचा जेव्हा विषय निघतो तेव्हा अमरावती हे शहर ओळखले जाते ते कविवर्य सुरेश भट यांच्यामुळे.कविवर्य सुरेश भटांनी आपल्या शब्दांची जादू केवळ महाराष्ट्रातच पसरवली असं नाही .तर जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे मराठी गझल पोहोचवण्याचं महत्त्वाचं काम सुरेश भट यांनी केलेले आहे. मी माझे भाग्य समजतो की सुरेश भटांची 20 वर्षे सेवा करण्याची संधी मला भरपूर प्रमाणात मिळाली .आमच्या घरी त्यांच्या प्रदीर्घ मुक्काम असायचा .सुरेश भट महाराष्ट्राचे गजलेच्या क्षेत्रातील दैवत आहेत. किती तरी नवीन गझलकारांना त्यांनी लिहिते केलेले आहे. गजलेची बाराखडी त्यांनी तरुण पिढीला शिकवून संपूर्ण महाराष्ट्र गझलमय करून टाकलेला आहे. भीमराव पांचाळे सुधाकर कदम राजेश उमाळे अशी कितीतरी ताकदीचे गझल गायक त्यांनी समाजाभिमुख केलेले आहेत .भट साहेबांबरोबर मला वीस वर्ष सोबत राहण्याचा योग आला. सुरेश भटांचे जिवलग मित्र सर्व सर्वश्री अरविंद ढवळे वली सिद्दिकी डॉक्टर मोतीलाल राठी रामदासभाई श्राफ दादा इंगळे ही माझी जिवलग मित्रमंडळी. त्यामुळे माझे व सुरेश भटांचे समीकरण फार लवकर जुळले .शिवाय माझ्याकडे माझ्या निवासस्थानाशिवाय पाच रूमचे भव्य विश्राम भवन असल्यामुळे सुरेश भट माझ्याकडे मुक्कामाला यायचे .भट मुक्कामाला येणार म्हणजे लोक घाबरायचे. कारण भट साहेबांना अटेंड करणं कठीणच काम होतं. पण ते इंद्रधनुष्य मी सौ विद्या आमच्या कन्या पल्लवी व प्राची माझे सहाय्यक श्री शिवदास भालेराव श्री शिवनयन ठाकरे यांनी समर्थपणे सांभाळले. आज गजलेला फार मोठे स्थान प्राप्त झालेले आहे. पण सुरेश भट जेव्हा जिवंत होते त्या पूर्वार्धाचा विचार केला तर तेव्हा अशी अनुकूल परिस्थिती नव्हती. सुरेश भट यांना सायकलवर फिरताना मी पाहिलेले आहे. सुरेश भट आणि सायकल हे न जुळणारे समीकरण आहे. परंतु या साध्या राहणी मधूनच त्यांच्याकडचा शब्द पिसारा फुललेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या गजलेमधला कवितेमधला प्रत्येक शब्द हृदयावर मोरपीस फिरवून जातो .सुरेश भट जिवंत असताना त्यांचा फार मोठा सन्मान झाला नाही .आम्ही त्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली.श्रीमती आशा भोसले यांची परवानगी मिळवली. कार्यक्रमाची जबाबदारी अर्थातच भीष्मपितामह व श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा श्री प्रभाकरराव वैद्य यांनी उचलली..परंतु 15 एप्रिल हा सुरेश भटांच्या वाढदिवस आणि विद्यापीठाच्या परीक्षा हे न जुळणारे समीकरण आडवे आले. त्यामुळे प्रभाकरराव वैद्य व मी हा भव्य सत्कार सोहळा नंतर घेण्याचे ठरले. परंतु काळाला ते मान्य नव्हते .आज भट साहेब आमच्यात नाहीत. परंतु त्यांनी आपल्या गजलेच्या निमित्ताने अमरावती शहराचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचविले आहे .त्या कलंदर माणसाला न्याय देण्यासाठी जी काही माणसे व्रतस्थपणे काम करीत आहेत .त्यामध्ये भीमराव पांचाळे यांचे नाव अर्थातच वरच्या क्रमांकावर आहे आणि आमचे विभागीय आयुक्त माननीय श्री दिलीप पांढरपट्टे साहेब यांच्या उपस्थितीत एका सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9 8 9 0 9 6 7 0 03

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 16 =