*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*
**शासकीय कर्मचारी आणि कामाची पद्धत**
शासकीय निमशासकीय कार्यालयात काम करणारे सर्व पदाधिकारी. अधिकारी. कर्मचारी. यांनी सर्वसामान्य जनतेबरोबर कसं वागावं आपलं काम आणि त्याच नियोजन कसं करावं यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत.शासकिय अधिकारी व कर्मचारी यांना नेते. पुढारी. आमदार. खासदार. मंत्री. संघटना. सेवाभावी संस्था. युनियन. यांना समाजावून घ्यावे लागते काहीजण विनंती करतात तर काहीजण या शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आपल्या पदांचा. सत्तेचा दबाव आणतता आणि जे नियमांत नाही असं काम करुन घेतलं जातं तरिही अधिकारी आणि कर्मचारी यांनी संयम बाळगला पाहिजे.
* शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आॅफिसचे काम घरी नेऊ नये
* ऑफिसला जाण्यापूर्वी कामांचे नियोजन आखणे गरजेचे आहे. वेळापत्रकानुसार काम केले पाहिजे
* शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ऑफिस व्यतिरिक्त गप्पा मारणें टाळावे
* शासकीय कार्यालयात मोबाईल वर तासंतास बोलन टाळावे
* शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी विहित वेळेत ऑफिस मध्ये पोहचणे गरजेचे आहे
* इंटरनेट चॅटिंग याचा वापर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी मर्यादित केला पाहिजे.
* शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या वैयक्तिक घरगुती चिंता घरीच सोडून या. कार्यालयात आपल्या कामावर आपले लक्ष केंद्रित करा.
* ऑफिसचा वेळ घरच्या कामांना देऊ नका
* शासकीय कार्यालयात वरिष्ठ अधिकारी आपल्याला जास्त काम देत असतील तर त्याची त्यांना कल्पना द्या.
* अधिकारी व कर्मचारी यांनी मनमोकळेपणाने एकामेकाशी संवाद साधला पाहिजे.
* कोणतीही जबाबदारी स्विकारताना ती जबाबदारी आपण पार पाडू शकतो कां याचा अभ्यास करा.
* लंच टाईम आणि टी टाईम यांवर मर्यादा घाला.
* इतर सहकारी यांच्या कामांत आपला वेळ घालवू नका
* ऑफिसच्या कामाचा वेग. आॅफिस मधील वातावरण.सहकारी. कामाचा ताण. कामातील समाधान. मिळणारा पगार. आॅफिसचे इतर याचा परिणाम आपल्या कामांवर होत असतो.
* तुमचा स्वभाव. वृत्ती.यामुळे आॅफिसचे काम घरी न्यावे लागते. वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या कामाला नाही महणाता येत नाही नाही म्हणायचे आपल्या स्वभावात नाही. मग यामुळे आॅफिस काम घरी नेऊन दडपण विरहित काम करण्याची त्यांना सवय लागते.तयामुळे आॅफिस मध्ये कामचलाऊ काम केलं जातं.
* बहुतांश आॅफिस मध्ये चर्चा.काॅलस . मिटींगज. यामध्ये आॅफिसचा वेळ वाया जातो.आणि कामामध्ये चालढकल येते त्यामुळे काम घरी नेण्याची वेळ येते.
* आॅफिसचे काम आॅफिस मध्ये संपवा आजचं आज.आॅफिसमधये फक्त कामाचा विचार आणि घरी फक्त घरचा विचार तरच आपल्या कामात स्वतंत्र पोर्टल तयार होईल.
* सुट्टीत घरकाम. मुलांचा अभ्यास.इ नियोजन बद्ध वेळ घालवला पाहिजे.
* कार्यालयात कामाव्यतिरिक्त चालणारे राजकारण बंद करा.
* वरिष्ठ अधिकारी यांचाही कोणितरी वरिष्ठ अधिकारी असतो हा आत्मविश्वास ढळू देऊ नका.
* सगळीकडे संगणक आलं आहे त्यामुळे काम सोप झाल लिखाण कमी झाल फक्त सर्व प्रोफाॅमाॅज रिपोर्ट्स रिटर्न्स हार्ड डिस्क वर वेळेवर भरतं चला.
* कामाच प्राधान्य न ठरवता कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचे याविषयी मनांत द्विधा असू नये.
* अधिकारी व कर्मचारी आपलं शासकीय काम साठवून मग काम जास्त आहे असा अहेरभाव आणतात.आणि सहकारी कर्मचारी आपलं काम वेळेवर करतो त्याला काही काम नाही असा शेरा दिला जातो.
* कामाचं प्राधान्य ठरविताना कामांचा उरक आपोआप होतो.तयामुळे घरी जाताना तानतणाव कमी होतो आणि घरचा वेळ आनंदात जातो.
* घरच्यांना वेळ दिला नाही त्याचा ताणतणाव मनांत असतो तोंच ताणतणाव घेऊन आपणं आॅफिस मध्ये येतो आणि आॅफिसचया कामांचा ताणतणाव यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे घरातील दुखणी. अडचणी.मुलाचे प्रश्न. यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कार्यालयात मन लागत नाही.
* सर्व कामं आपलंच आहे इतरांना आखून दिलेले काम मीच करतो. त्यामुळे माझं काम तसंच राहतं “” माझ्यावाचून खुप आडेल “” ही भावना मनातून काढून टाका.
* शासकीय अधिकारी यांनी इतरांना काम सोपवायला हवी आपणं अधिकारी आहे असा अधिकार न गाजवता कर्मचारी यांना कामात मदत करायला हवी.
* कर्मचारी कपात. नोकरभरती बंद. स्वेच्छानिवृत्ती. तांत्रिक अडचणी. इतरही सरकारी काम आपल्या कक्षेत नसताना करावे लागते यांवर मात करणे आवश्यक आहे.
* नोकरभरती बंद. माणसं कमी. काम जास्त. पगार भरपूर.पण उपयोग काय ?? पूर्वी आठ तास काम असायचं आत्ता बारा तास सुध्दा कमी पडत आहेत.माणूस काम करुन करुन करणारं किती ?? मात्र काम झालं पाहिजे उरकलं पाहिजे. जादा वेळ आॅफिस मध्ये बसल पाहिजे तरि ही काम नाही उरकलं तर घरी आणलं पाहिजे काम त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे.
* संगणक ज्ञान कमी त्यामुळे इतरांची मदत द्यावी लागत आहे. अन्य काम उरकावी लागतात त्यातुन अनेक चुका होतात मग तेच तेच काम पुन्हा करावं लागतं
* कधी कधी कमी वेळात जास्त काम करावे लागते.नाही उरकलं तर मनस्वास्थ्य बिघडते कामाचा तिटकारा येतो.
* टीमवरक मध्ये काम करणार्या सदस्यांची संख्या कामाच्या स्वरुपात कमी असते. मग रात्रंदिवस करुनही ते काम उरकत नाही.
* कार्यालयीन वेळेत शक्य तेवढे घरचे काम उरकणे हीच प्रवृत्ती अनेक ठिकाणी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यात दिसून येत आहे.
* ज्यांना क्षेत्रिय काम असतें त्यांना कार्यालयीन मदतनीस असतांत जेव्हा बाहेर मुक्काम असतो तेव्हा बरेचं कार्यालयीन काम करणे सहजशक्य असतं.
* फिरतीत घेतलेल्या कामांची टिपणी वेगळीच काढणे आवश्यक असते.तयामुळे कार्यालयीन निपटारा लवकर होतो .
* जेव्हा नेहमी कार्यालयात असूनही काम पेंडीग पडत असतील तर त्यासाठी कारणीभूत आहेत या गोष्टी
* नियोजनाचा अभाव
* स्वनिर्मित गुंतागुंत.
* स्वार्थी हेतूने मुद्दाम प्रकारणे प्रलंबित ठेवणें
* निरणयशकतिची कमतरता
टंगळमंगळ करीत केलेला वेळेचा अपव्यय
* वरिष्ठ अधिकारी यांची अकार्यक्षमता
* झटपट आणि अचूक निर्णय घेता आले पाहिजेत.
* जे कामात कच्चे असतील त्यांच्याकडून सर्व काम तत्पर निपटारयाची अपेक्षा करणे ही चूक आणि त्यासाठी कर्मचारी यांना दोष देणे ही घोडचूक ठरेल
* प्रत्येक कागदावर लवकरात लवकर निकाली काढा असे शेरे मारत राहील्यास कर्मचारी त्या अधिकारी यांना कुचकामी ठरवतात.
* कनिष्ठ पदावर काम करणारे न सांगता आॅफिसला दांड्या मारतात त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांना त्याचे काम घरी घेऊन जावे लागते. कनिष्ठाना जाब विचारुन ही त्याचे काम करावे लागते.
* सर्व शासकीय कार्यालयात प्रत्येकजण आपली आपली जबाबदारी ओळखून कामे करत असेल तर आपलं काम घरी घेऊन जाण्याची अधिकार कर्मचारी यांना गरज पडणार नाही.
* अधिकारी कुषल असावा. अगोदरच्या प्रश्नात भर न घालणारा उलट त्याची सोडवणूक करणारा असावा. आॅफिसला वेळेवर येणारा.कामकाजासाठी वेळ देणारा. भेटायला आलेल्या लोकांना कामाशिवाय जास्त वेळ बसू न देणे.या बाबी पाळणे गरजेचे आहे.
* कार्यालयीन वेळेत खासगी काम करु नये. किरकोळ प्रकरणांवर चर्चा करुन वेळ वाया घालवू नये.
* आॅफिसचे काम आॅफिस मध्ये संपवून घरी आल्यावर कुटुंबाबरोबर वेळ घालवणारे अधिकारी व कर्मचारी यांची संख्या आज कमी झाली आहे.
* विविध प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी आपले आॅफिसचे काम घरी आणतांना दिसतं आहेत.यात कारणं आहे कार्यालयीन वेळ वाया . जनसंपर्क. अनपेक्षित बैठका. भुतकाळातील अपूर्ण गोष्टींची पूर्तता. अंत्यंत गोपनीय अथवा महतावाचया कामांना द्यावा लागणारा वेळ.इतर सहकारी यांचे सहकार्य. विद्युत पुरवठा. कामाचं ठिकाण. दुसर्यावर अवलंबून राहणे.
* कामाची पद्धत बदला . कामांचे विकेंद्रीकरण करा. आधुनिक तंत्रज्ञान वापर करा. नियोजन करा. पहा आॅफिस एके आॅफिस आणि घर एके घर
* योग्य माणूसबळ आणि योग्य साधन यांची उपलब्धता हवी.कामाचा उरक . काम करण्याची धमक. आंतरिक प्रेरणा.मन कामात गुंतवा
* माहितीच्या अधिकाराखाली आलेल्या अर्जाचा मनांवर दडपण न घेता निपटारा करणे.
* महिला कर्मचारी यांना सन्मानाची वागणूक देणे.
वरील प्रमाणे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी आपली काम केली तर नागरि सनद विहित कालावधीत काम पुर्ण होण्यास कोणतीच अडचण येणार नाही आणि जनतेचा वेळ आणि पैसा वाया जाणार नाही . आपले कर्तव्य आपणास कळलं पाहिजे. टेबलाखालची मिळकत विसरा. पगार आहे. त्यावर समाधान माना.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859