*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री नुपूर प्रशांत शिरवाडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*असे थोर माझी वीर माता जिजामाता*
संपवाया मुघलांचे साम्राज्य स्थापन केले त्यांनी स्वराज्य
अंत कराया मुघलांचा आता
असे थोर माझी वीर माता जिजामाता
दिला जन्म त्यांनी शिवबांना
गोष्टीतून शिकवी कसा द्यावा आदर साधुसंतांना
वीर पुत्राची असे ती वीर माता
असे थोर माझी वीरमाता जिजामाता
गनिमी कावा करून या शत्रू वरती
मग होईल पाळता भुई थोडी ची शत्रूंवर परिस्थिती पसरवूया सर्वत्र समानता
असे थोर माझी वीर माता जिजामाता
कधी होई रणरागिणी पण कधीही न आटे तिची ममता
असे थोर माझी वीर माता जिजामाता
-नुपूर प्रशांत शिरवाडकर
कुर्ला (पूर्व), मुंबई