You are currently viewing भाजपा दोडामार्ग च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट

भाजपा दोडामार्ग च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची विधान भवनात भेट घेतली. यावेळी तालुक्यातील रस्ते व अन्य विकासकामांना प्राधान्याने निधी मिळावा, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वखाली दोडामार्ग भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, ,माजी जि प उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, नगरसेवक संतोष नानचे,माजी प स सदस्य चंदू मळीक, शक्तीकेंद्र प्रमुख प्रवीण गांवकर आदींनी श्री. चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील विविध विकासकामाची निवेदन देण्यात आली. तालुक्यातील महत्वाच्या रस्त्यांची दुरावस्था कायम आहे. त्याची दुरुस्ती होण्यासाठी प्राधान्याने निधी देण्यात यावा. तसेच अन्य विकासकामांना निधी मिळावा अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी तालुक्यातील विकासाबाबत मी सकारात्मक आहे. लवकरच विकास कामाचा आढावा घेऊन नियोजन करण्यात येईल. तालुक्याला निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही श्री. चव्हाण यांनी दिली. तसेच त्यांनी पक्ष संघटना बांधणीबाबतही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, पदाधिकाऱ्यांनी माजी खासदार निलेश राणे यांचीही भेट घेऊन चर्चा केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा