You are currently viewing पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांची बदली रद्द करा ; कणकवलीवासीयांची मागणी

पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांची बदली रद्द करा ; कणकवलीवासीयांची मागणी

कणकवली

सर्वसामान्य जनतेला न्याय देणारे कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावले यांची कणकवली पोलीस ठाण्यातून कुडाळ येथे केलेली बदली रद्द करावी, अशी मागणी कणकवली वासीयांतून होत आहे. एप्रिल २०२२ मध्ये कणकवली पोलीस ठाण्याचा प्रभार स्वीकारलेल्या हुलावले यांनी कणकवली शहरासह तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच सर्वसामान्य जनतेचा विश्वाससुद्धा संपादन केला आहे. आधीच पोलीस स्टेशन ची पायरी चढायची म्हणजे अजूनही आम जनतेच्या मनात नाही म्हटलं तरी थोडीशी धाकधूक असते. मात्र पोलीस निरीक्षक हुलावले यांनी आपल्या अधिकारीपदाचा कुठलाही बडेजाव न करता मधाळ वाणीने आणि सर्वसामान्य जनतेची व्यथा समजून घेत त्यावर त्वरित निर्णय घेत कारवाई करण्याच्या आपल्या कार्यपद्धतीने तालुक्यातील खेड्यापाड्यातील जनतेच्या मनात खाकी वर्दीबद्दल विश्वास निर्माण केला. त्यामुळेच जिथे पोलीस स्टेशनची पायरी चढताना मनात धाकधूक असणारी अगदी खेड्यापाड्यातील जनता आता साहेबांना भेटायचे आहे असे म्हणत अगदी बिनदिक्कत थेट पोलीस निरीक्षक दालनातसुद्धा जाऊन पोलीस निरीक्षक हुलावले यांच्या कानावर आपली अडचण, आपल्यावरील झालेला अन्याय सांगू लागली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा