You are currently viewing सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज मध्ये परजिल्ह्यातील कर्मचारी भरतीचा प्रयत्न मनसेने हाणून पाडला

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज मध्ये परजिल्ह्यातील कर्मचारी भरतीचा प्रयत्न मनसेने हाणून पाडला

सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी भरतीच्या जाहिराती सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील वृत्तपत्रांमधे

मनसेचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांना दणका..

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात अनागोंदी कारभार सूरु असल्याचा आरोप करत लिपिक,शिपाई,ड्रायव्हर आदी कर्मचारी परजिल्ह्यातील भरती केल्याने मनसेच्या वतीने वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता श्री एस एस मोरे यांना चक्क 4 तास घेराव घालण्यात आला. तर या वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेला अनागोंदी कारभार हा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस एस मोरे व त्या ठिकाणी कार्यरत असलेले क्लार्क पियुष फुसांडे यांच्या मनमानी कारभारामुळे सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.दरम्यान यावेळी वैद्यकीय महाविद्यालयात विना पगारी कर्मचारी कार्यरत असल्याचे भासवून कर्मचारी आपले नातेवाईकांना भरती करत असल्याने मनसे पदाधिकरी आक्रमक झाले. असे कर्मचारी ठेवता येतात का,त्यांचे पोलीस रेकॉर्ड तपासले आहे का,त्यांच्याकडून चुकीचे घडल्यास कोणाला जबाबदार धरणार असा प्रश्नांचा भडिमार करत जिल्ह्यातील उमेदवारांना डावल्यास बाहेर फिरणं बंद करू असा इशारा मनसे तालुकाध्यक्षांनी दिला.मनसेच्या झाड झडतीनेया कार्यरत असलेले क्लार्क पियुष पुंगळे यांचे काही नातेवाईकच या ठिकाणी काम करत असल्याची माहिती समोर आली. यामुळे आक्रमक मनसे कार्यकर्त्यांनी एस एस मोरे यांना धारेवर धरत बैठकीचे इतिवृत्त मागितले असता क्लार्क पियुष फिसंडे यांनी कोणीही येऊन आम्हाला काही विचारणार का असे म्हणत शासकीय कागदपत्रे जमिनीवर आपटल्याने या प्रकरणात आणखीनच तणाव निर्माण झाला.दीपक गावडे,सुनील गवस आदी मनसे पदाधिकारी अधिकच आक्रमक झाल्याने यानंतर संबंधित लिपिकाने अखेर माफी मागितली. वैद्यकीय महाविद्यालयातील भ्रष्ट प्रकाराबाबत आपण लवकरच जिल्ह्यात येणाऱ्या मंत्र्यांसमोर वैद्यकीय महाविद्यालयाचा पाढा वाचणार असून मंत्र्यांना देखील जाब विचारणार असल्याचे मनसे पदाधिकऱ्यांनी स्पष्ट केले. महाविद्यालयातील सर्वच बाबींचे विशेष ऑडिट करण्यात यावे अशी मागणी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे करणार असल्याची माहिती मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केली.जिल्ह्यातील कर्मचारी भरती निविदा जाहिराती सातारा व कोल्हापूर मधील दैनिकांनामध्ये दिल्या जातात जेणेकरून जिल्ह्यातील उमेदवारांना माहिती मिळू नये असा आरोप मनसेने केला. जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात असा भ्रष्टाचार करून परजिल्ह्यातील उमेदवार भरती करत असताना जिल्ह्यातील आमदार खासदार झोपले आहेत का असा सवाल मनसेने केला.महाविद्यालयाचे क्रेडिट घेणाऱ्यांनी या भ्रष्ट कारभाराची ही जबाबदारी घ्यावी असा प्रश्नही मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी उपस्थित करत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या सहमतीनेंच हे सर्व प्रकार होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली ह्या आंदोलनात दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुनील गवस,बाबल गावडे,कुणाल किनळेकर,अमित इब्राहिमपुरकर,राजेश टंगसाळी,अविनाश अणावकर,दीपक गावडे,रामा सावंत,मोहन हेदुळकर,अमोल जंगले आदी पदाधिकारी उपस्थित होते.मनसेने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत वैद्यकीय महाविद्यालयाने सात सप्टेंबर ला बैठक आयोजित करून झालेल्या अनियमित्तांबाबत जोशींवर कारवाई करू असे ग्वाही दिल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी चार तासानंतर आंदोलन स्थगित केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा