भाजपा पदाधिकारी यांचे आसोली ग्रामस्थांना अभिवचन…
भाजपा पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यानंसमवेत आसोली पुलाची केली पाहणी…
आसोली हायस्कूल समोरील पुल हा गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेला व दिवसेंदिवस खचत चालला असुन, दरवर्षी त्या पुलाला मोठमोठे भगदाडे पडत आहेत. स्थानिक ग्रामस्थ दरवर्षी पडलेली भगदाडे काँक्रीटच्या सहाय्याने बुजवतात व वाहतूक सुरळीत करतात. परंतु बांधकाम विभागाकडे निधीची तरतूद नसल्याचे कारण देत दरवर्षी सदर कामाला निधी अभावी मंजुरी मिळत नाही. त्यामुळे पावसाच्या दिवसात ग्रामस्थांबरोबर शाळेत शिकणारया मुलांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
ह्यावर्षी सुध्दा सदर पुलाला मोठे भगदाड पडल्याने नियमित सुरू असलेली एस् टी वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे २०० ते २५० कुटुंबांना त्याचा फटका बसला आहे. ही अडचण लक्षात घेऊन वेंगुर्ले तालुक्यातील भाजपा पदाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री. भगत यांना सोबत घेऊन त्या पुलाची पहाणी केली. तसेच लवकरात लवकर त्या पुलाचे अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे बजेट मध्ये किंवा नाबार्ड योजनेमध्ये प्रस्तावित करावे असे सांगण्यात आले.
तसेच सदर प्रश्नी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे लक्ष वेधून लवकरात लवकर या कामाला निधी मंजूर होण्यासाठी पाठ पुरावा करणार असल्याचे भाजपा शिष्टमंडळाने ग्रामस्थांना आश्वासीत केले.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, परबवाडा सरपंच पपु परब, जेष्ठ नेते प्रकाश रेगे, माजी सरपंच व महिला मोर्चाच्या सुजाता देसाई, ग्रा.पं.सदस्य व युवा मोर्चाचे संकेत धुरी, आसोली सरपंच रीया कुडव, बुथप्रमुख गुरुनाथ घाडी, ग्रामस्थ आत्माराम घाडी, नारायण घाडी, आनंद धुरी, देवेंद्र धुरी, राकेश धुरी, संतोष चव्हाण, नंदा घाडी, विलास मेस्त्री आदी ग्रामस्थ उपस्थित होते.