You are currently viewing ३१ ऑगस्ट पूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत e-KYC बंधनकारक..

३१ ऑगस्ट पूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत e-KYC बंधनकारक..

३१ ऑगस्ट पूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत(PM -KISAN) नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी e-KYC करणे बंधनकारक आहे. पात्र लाभार्थ्यांकरिता e-KYC करण्यासाठी OTP किंवा बायोमॉट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे.

सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ही e-KYC प्रमाणीकरणाची प्रक्रिया करण्यासाठी नजीकच्या महा-ई-सेवा केंद्रामध्ये जाऊन किंवा लाभार्थ्यांनी स्वतः PM -KISAN योजनेच्या अधिकृत संकेतस्थळ (http://pmkisan.gov.in >Famers Corner >e-KYC) येथून आपले मोबाईलद्वारे e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आहे. e-KYC प्रमाणीकरण पूर्ण न झाल्यास लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM -KISAN) लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

त्यामुळे वैभववाडी तालुक्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM -KISAN) नोंदणी केलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपली e-KYC ची प्रक्रिया पूर्ण केलेली नसल्यास अशा लाभार्थ्यांनी दि. ३१.०८.२०२२ पूर्वी e-KYC ची प्रक्रिया पूर्ण करावी, असे वैभववाडी तहसीलदार रामदास झळके यांनी आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा