वैभववाडी तहसीलदार कार्यालयामध्ये दिनांक २५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५.०० या वेळेत मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा महिलांसाठी ‘शिबिर एक – लाभ अनेक’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमात शासनाच्या विविध २४ योजनांचा लाभ एकाच वेळी एकाच दिवशी लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
वैभववाडी तालुक्यातील कोविड – १९च्या प्रादुर्भावामुळे एकल/विधवा महिलांनी उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांमध्ये असलेल्या त्रुटींची पूर्तता शिबिरामधील संबंधित टेबलकडे पूर्ण करण्याचे आहे व त्याच दिवशी पूर्ण कागदपत्रे कार्यालयात सादर करण्याची आहेत.
कोणीही लाभापासून वंचित राहू नये याकरिता सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वैभववाडी तहसिलदार श्री. रामदास झळके यांनी केले आहे.