नवलराज विजयसिंह काळे यांच्या संकल्पनेतून गुरुवारी सडूरे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन
श्री माऊली चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग, ग्रामीण आरोग्य फाउंडेशन सिंधुदुर्ग, कै. नारायण शांताराम गोसावी चॅरिटेबल ट्रस्ट,
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय व हिंद लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत सदस्य श्री नवलराज विजयसिंह काळे आयोजित डोळे तपासणी (मोतीबिंदू) तपासणी व रक्त तपासणी शिबिर(मोतीबिंदू असल्यास त्याची शस्त्रक्रिया देखील मोफत करून देणार…
ब्लड प्रेशर सहित खालील सर्व रक्त तपासण्या देखील होणार मोफत…
CBC (हिमोग्लोबिन तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी प्लेटलेट व इतर) HbA1c (शुगर तीन महिन्याचा कंट्रोल टेस्ट), T3,T4,TSH (थायरॉईड टेस्ट) Ca 19 (कॅन्सर टेस्ट),Calcium (कॅल्शियम टेस्ट) Sugar Random (शुगर-ग्लुकोमीटरवर), HB Electrophoresis अशा टेस्ट संपूर्ण मोफत होणार असून सदर आरोग्य शिबिरामध्ये सहभाग नोंदवून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.