You are currently viewing मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत आयोजित शालेय स्पर्धांचा शुभारंभ

मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत आयोजित शालेय स्पर्धांचा शुभारंभ

सावंतवाडी येथील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कडून आयोजित शालेय स्पर्धांचा शुभारंभ सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त गावागावात,शहराशहरात ठीक ठिकाणी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं. याच धर्तीवर ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून ७ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मळेवाड कोंडूरे गावातील शालेय मुलांच्या विविध स्पर्धांचे आयोजन राणी पार्वतीदेवी विद्यालय मळेवाड केंद्र शाळा नंबर १ च्या सभागृहात करण्यात आले होते. या शालेय स्पर्धाचा शुभारंभ ग्रामपंचायत सरपंच मिलन पार्सेकर यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आला.यावेळी उपसरपंच हेमंत मराठे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश राऊत,ग्रामपंचायत सदस्य अमोल नाईक,स्नेहल नाईक,महेश शिरसाट, मधुकर जाधव,कविता शेगडे,तात्या मुळीक,सानिका शेवडे,ग्राम विकास अधिकारी अनंत गावकर, पोलीस पाटील दिगंबर मसुरकर आदी ग्रामस्थ व शिक्षक विद्यार्थी ,पालक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शुभारंभ प्रसंगी उपसरपंच हेमंत मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना गावातील शालेय मुलांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं आणि आपली कला सादर करता यावी यासाठी शालेय मुलांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.तसेच दिवाळीनंतर मळेवाड कोंडूरे गावातील शाळेतील मुलांसाठी शालेय क्रीडा महोत्सव घेण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.तर सरपंच मिलन पार्सेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्पर्धेत सहभागी झालेल्या मुलांना शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा