You are currently viewing कवितेचा जन्म (माझा प्रवास)

कवितेचा जन्म (माझा प्रवास)

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी रामदास अण्णा लिखित अप्रतिम काव्यरचना

जागतिक कवी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कवितेचा जन्म (माझा प्रवास)

आधी होती इच्छा, खूप काही लिहायची।
मनातील कुजबूज, ही मानतच राहायची।।

सुरू झाले जोडणे, दोन शब्द चार ओळी।
शब्दाला शब्द जोडून, लिहली मी चारोळी।।

चारोळ्या खूप झाल्या पण, पोट नाही भरायचं।
तेंव्हा मी ठरवलं आता, वेगळंच करायचं।।

लिहण झालं ठप्प, असे काही दिन गेले।
अचानक मग मला, माझेच भान आले।।

विचार केला मी आणि, सुरुवात केली पुन्हा।
प्रतिसाद देत नाही मला, माझा नाही गुन्हा।।

पण दिवस असाच, एक चमत्कार झाला।
अनोळखी मित्र माझ्या, सहवासात आला।।

म्हणे आण्णा स्तुतीसाठी, शब्द कमी पडतात।
असे लिहणारे कवी, नशिबाने घडतात।।
बरे वाटले मनाला मग, जोपासला मी छंद।
आता लिहण्याचा खुप, मिळतो नवा आंनद।।

सरस्वती माता जशी, प्रसन्नच झाली।
याच शब्दांनी मला, नवी ओळख दिली।।

रामदास आण्णा
©® चे सर्व अधिकार आरक्षित आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा