You are currently viewing मायेचा पसारा

मायेचा पसारा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री भावना ईटकिकर लिखित अप्रतिम काव्यरचना

मायेचा पसारा

मायेचा पसारा तुझा
सावरु कसा ?
सावरता सावरता
भरतोया उसासा

खार्या पाण्यांची तळे
वाहती खळखळ
कोंदलेल्या हुंदक्यांनी
श्वास करतोया तळमळ

प्रेम-दया-माया
तुझाच तो ठेवा
पारखं घर माझं
सांगू मी कोणाला

पोरका रे वाडा
रडे ढसाढसा
पिलांची आर्तता
घे जरा कानोसा

सौ.भावना अजय ईटकिकर

प्रतिक्रिया व्यक्त करा