स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मार्फत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत केंद्र शाळा बांदा नंबर एकचा, इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या कु. नील नितीन बांदेकर याने पहिली ते चौथी या गटातून संपूर्ण जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला.
या स्पर्धेच्या एकूण तीन फेऱ्या झाल्या .
पहिली फेरी केंद्रस्तरावर, दुसरी फेरी तालुकास्तरावर आणि तिसरी जिल्हास्तरावर घेण्यात आली.
या तीनही फेऱ्यांमध्ये नील बांदेकर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला.
17 ऑगस्टला ओरोस येथील शरद कृषी भवन सभागृहात , पार पडलेल्या, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या सांगता समारोपामध्ये नील बांदेकर याचा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.प्रजीत नायर आणि जिल्हाधिकारी के .मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
नीलच्या यशात बांदा केंद्र शाळेचे समस्त शिक्षक वृंद ,मुख्याध्यापक तसेच बांदा केंद्र शाळेचे शालेय प्रशासन व्यवस्थापन अध्यक्ष निलेश मोरजकर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. विविध स्तरातून नीलवर कौतुकाचा वर्ष होत आहे