कणकवली
हळवल ग्रामपंचायत व सावली फाउंडेशन च्या वतीने हळवल गावातील महिलांना फिनोल व हँडवॉश बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांना तसेच युवकांना स्वयंरोजगार मिळवून आर्थिक उन्नतीच्या दिशेने वाटचाल करण्याचे हेतूने संस्था काम करत असते यापुढील काळात शिक्षणासोबत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या किंवा ग्रामस्थांच्या व्यवसाय उद्योगधंद्यांच्या मागणीनुसार टप्प्याटप्प्याने प्रत्येक गावात प्रशिक्षण देण्याचा सावली संस्थेचा मानस आहे. असे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री सुशांत दळवी यांनी सांगितले.
यावेळी हळवल गावचे उपसरपंच श्री. अरुण राऊळ ग्रामपंचायतचे सदस्य श्री सुदर्शन राणे ,श्री जाधव, ग्रामसेवक व कर्मचारी प्रशिक्षणाचे रत्नागिरीतील प्रशिक्षक श्री कांबळे सर सावली संस्थेचे कार्याध्यक्ष सुशांत दळवी. संस्थेचे संयोजक प्रसाद देसाई संस्थेचे सचिव उद्धव शिंदे संस्थेचे सभासद संतोष पुजारे ,सदानंद चव्हाण ,भुपेश चव्हाण,अभिषेक देसाई, प्रमोद घाडीगावकर तसेच गावातील बचत गट प्रमुख व महिलावर्ग उपस्थित होते