सावंतवाडी :
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने तळवडे येथील श्री जनता विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाला सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन तसेच सुमारे १०० सॅनिटरी पॅड मोफत उपलब्ध करून देण्यात आले. याचा लाभ या ग्रामीण भागातील सुमारे २०० विद्यार्थिनींना होणार आहे.
यावेळी संस्था प्रतिनिधी प्रा. दिलीप गोडकर, सुरेश गावडे, रवींद्र परब, मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, पर्यवेक्षक दयानंद बांगर आणि शिक्षिका सौ. नाईक, सौ. देसाई, सौ. चव्हाण तसेच इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, क्लबच्या सदस्या डॉ. शुभदा करमरकर, मृणालिनी कशाळकर आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. शुभदा करमरकर यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात घ्यावयाची काळजी याबाबात बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेमार्फत इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीचे आभार मानण्यात आले.