सावंतवाडी
मराठा समाजाला आरक्षण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक असावे म्हणून मा आमदार विनायकराव मेटे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत पुढाकार घेतला, ते प्रत्यक्षात साकार होईल तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असा विश्वास सावंतवाडी मराठा समाजाने आयोजित केलेल्या श्रध्दांजली सभेत व्यक्त करण्यात आला.
मराठा समाजाचे नेते मा आमदार विनायकराव मेटे यांना सावंतवाडी मराठा समाजाने श्रध्दांजली वाहिली. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, विकास सावंत, अँड सुहास सावंत, अच्युत सावंत भोसले,सौ अर्चना घारे परब, अध्यक्ष सिताराम गावडे, लक्ष्मण नाईक, राघोजी सावंत, अशोक दळवी, नारायण राणे, अँड शामराव सावंत, पुंडलिक दळवी, प्रेमानंद देसाई, मंगलदास देसाई, अँड निता कविटकर,भाई देऊलकर, भारती मोरे,दिपाली सावंत,नाना धोंड, प्रसाद दळवी,धोंडी दळवी, एकनाथ जाधव,सुरज लाड, प्रशांत बिरोडकर, संदिप गावडे, सचिन बिरोडकर,शुभम घावरे,सागर गावडे,जयवंत घोगळे दिव्येश बिरोडकर,अँड संतोष सावंत, दर्शना बाबर देसाई, विश्वास घाग, चंद्रकांत राणे, आकाश मिसाळ, प्रमोद गावडे,आर के सावंत,अमरनाथ सावंत, विनोद सावंत, दिपाली सावंत, संदेश परब, प्रल्हाद तावडे, बाळु सावंत, निलेश मोरजकर, गुरूनाथ सावंत, दिपक सावंत , ज्ञानेश्वर सावंत, अँड संदेश राणे, जय भोसले, जीजी जोशी, दिगंबर नाईक,लक्ष्मण नाईक, प्रसाद दळवी, संकेत सावंत ,लक्ष्मण दळवी, श्रीपाद सावंत आदी उपस्थित होते.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, मराठा समाजाचे काम अनेक नेत्यांनी सुरू केले. विनायक मेटे यांनी सुध्दा नियोजनबद्ध पद्धतीने मराठा समाजासाठी काम करत होते.ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असताना मी व आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबत काम केले.
नंतर त्यांनी भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर राहीले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण, नोकरी सुविधा, शैक्षणिक सवलती, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक व्हावे म्हणून सतत प्रयत्न आणि पाठपुरावा केला. मराठा समाजाला आरक्षणातून त्यांचे स्वप्न साकार होईल.
अखिल मराठा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अँड सुहास सावंत म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार, मराठा समाजाचे नेते म्हणून विनायकराव मेटे यांनी मोठे स्थान निर्माण केले. योगदान दिले. त्यांनी मराठा आरक्षणासाठी धडपड करत आरक्षणाचा ध्यास घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात स्मारक असावे म्हणून प्रयत्न केला. शासनाने स्मारक आराखडा तयार व्हावा म्हणून पाठपुरावा केला. सिंधुदुर्ग – सावंतवाडी मध्ये शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून ते आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब, मराठा समाजासाठी वाहून घेतलेल्या विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने समाजाचा लढवय्या नेता हरपला. आमदार म्हणून देखील त्यांनी बरेच काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी भरारी घेतली होती. रंगकाम करणारे मेटे साहेब आमदार आणि मराठा समाजाचे नेते बनले. मराठा आरक्षण आणि अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले तर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास सावंत म्हणाले, मराठा आरक्षण आणि मराठा समाज विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून ते काम करत होते. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम करत राहिल्यास श्रध्दांजली ठरेल.
यावेळी अँड. निता सावंत कविटकर यांनी थोडक्यात माहिती दिली. सावंतवाडी मराठा समाज अध्यक्ष सिताराम गावडे म्हणाले, मराठा समाजात योगदान देणाऱ्या प्रत्येकालाच आरक्षणासाठी धडपड केली. विनायकराव मेटे यांनी मराठा समाजाचे नेते म्हणून केलेल्या कार्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाने समाजात एकोप्याने राहावं.
यावेळी मा आमदार विनायकराव मेटे यांना पुष्पांजली वाहण्यात आली. अध्यक्ष सिताराम गावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.