*मोटारसायकल रॅली, ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतशबाजीत केले जंगी स्वागत*
*शिवसेना-युवासेना कुडाळ, हुमरमळा व हेल्प ग्रुपच्या दहीहंडी उत्सवास आ. वैभव नाईक यांची उपस्थिती*
विविध प्रकारच्या आमिषांना बळी पडून शिवसेनेतील अनेक आमदार खासदारांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे. मात्र सिंधुदुर्गचे वैभव असलेले शिवसेनेचे आमदार वैभव नाईक मात्र शिवसेना पक्षाशी व उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले याबद्दल अतुल बंगे यांच्या संकल्पनेतून हुमरमळा- वालावल गावाच्या वतीने निष्ठा गौरव सन्मान सोहळा आयोजित करुन महिलांच्या हस्ते आ. वैभव नाईक यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाल श्रीफळ व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतीक असलेली तलवार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रथमतः माड्याचीवाडी ते हुमरमळा पर्यंत भव्य मोटार सायकल रॅली काढून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतशबाजीत आमदार वैभव नाईक यांचे हुमरमळा गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी पुष्पवृष्टी करुन औक्षण करत कार्यक्रम स्थळी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवसेना-युवासेना कुडाळच्या वतीने शिवसेना शाखेसमोर त्याचबरोबर शिवसेना युवासेना हुमरमळा येथे शुक्रवारी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून दहीहंडी उत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.कुडाळ शिवसेना शाखेसमोर पि. के. डान्स अकॅडमीच्या मुलांच्या डान्स चे आयोजन करण्यात आले होते.
तसेच नगरपंचायत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तर हुमरमळा येथे जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कुडाळ नक्षत्र टॉवर समोर हेल्प ग्रुपच्या दहीहंडी उत्सवाला आ. वैभव नाईक यांनी भेट दिली.यावेळी त्यांच्या हस्ते सेल्फी पॉईंट चे उदघाटन करून लष्करातील सैनिक व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी हुमरमळा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, ओबीसी सेल जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर, कुडाळचे शिवसेनेचे नेते अतुल बंगे, राजू गवंडे,महेश वेळकर,प्रसाद राऊळ ,सरपंच अर्चना बंगे, उपसरपंच स्नेहल सामंत, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये,अमृत देसाई,सौ. सोनाली मांजरेकर, सौ. रमा गाळवणकर, शिवसेना शहरप्रमुख रमेश परब, युवासेनेचे वालावल पंचायत समिती विभाग प्रमुख मितेश वालावलकर,शंकर पाटकर, प्रदीप तोंडवळकर,संतोष अडूळकर, युवासेनेचे शाखाप्रमुख संदेश जाधव, युवासेनेचे उपशाखा प्रमुख आशु परब, सौ अपुर्वा देसाई, मयुर प्रभु, अमित बंगे, शैलेश मयेकर, ओमकार कानडे, उपस्थित होते.
कुडाळ शाखा येथे शिवसेना युवानेते संदेश पारकर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रूपेश पावसकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर,कुडाळ नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, ज्योती जळवी, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, संजय भोगटे, माजी उपसभापती जयभारत पालव, अवधूत मालणकर, युवासेना उपतालुकाप्रमुख रोहीत भोगटे, चेतन पडते, संदिप म्हाडेश्वर,कृष्णा तेली,गंगाराम सडवेलकर, दीपक आंगणे, दीपक सावंत, नितीन सावंत, बाळा पावसकर, अमित सावंत, संदेश सावंत, अमित राणे, बाबी गुरव,गोट्या चव्हाण,प्रथमेश राणे, सतीश कुडाळकर,तर हेल्प ग्रुपच्या दहीहंडी उत्सवात नगराध्यक्षा आफरीन करोल,संग्राम सावंत,मनोज वालावलकर, संजय कोरगावकर, रत्नाकर जोशी, गुरु गडकर आदी उपस्थित होते.