मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
कणकवली
मराठा आरक्षणासाठी झटणारे, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मराठा समाजाचे नेते ऍड. सुहास सावंत यांच्या उपस्थितीत रविवार दि. २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता कणकवली मराठा मंडळ सभागृह येथे श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा समाजाचे नेते,पदाधिकारी व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा मराठामंडळाचे उपाध्यक्ष सतीश सावंत यांनी केले आहे.