You are currently viewing सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची ७८ वी जयंती साजरी

सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस तर्फे राजीव गांधी यांची ७८ वी जयंती साजरी

सावंतवाडी

सावंतवाडी येथील राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 78 व्या जयंती उत्सवानिमित्त यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

सावंतवाडी तालुका काँग्रेस कार्यालयामध्ये झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष ऍड दिलीप नार्वेकर माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विकास भाई सावंत महिला काँग्रेस प्रांतिक सदस्य विभावरी सुकी शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर चंद्रकांत राणे आनंद परुळेकर अभय मालवणकर संदीप सुकी संजय लाड आनंद कुंभार जास्मिन लक्ष्मेश्वर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले त्यांची आठवण काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कायम स्मरणात ठेवावी ते एक डायनामिक आणि युवा नेतृत्व असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले

प्रतिक्रिया व्यक्त करा